टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आज म्हणजेच ५ नोव्हेंबर २०२२ रोजी ३४ वर्षांचा झाला आहे. विराट सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे जिथे टी-२० विश्वचषक २०२२ खेळला जात आहे. विराटला वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले आहे. परंतु, लहानपणी विराटची आवडती अभिनेत्री कोण होती, याचा त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटला आवडणारी अभिनेत्री कोण –

विराट कोहलीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लहानपणी त्याला कोणती अभिनेत्री आवडायची. त्यानंतर कोहलीने सांगितले की, त्याला लहान वयातच करिश्मा कपूर आवडायची. विराटने २०१७ मध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केले. या जोडप्याला वामिका नावाची मुलगी आहे. वामिकाचा जन्म गेल्या वर्षी ११ जानेवारीला झाला होता.

विराटचा आज ३४ वा वाढदिवस –

दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळून या खेळात आपली कारकीर्द घडवणारा विराट आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या युगातील जगातील महान फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. तो मैदानात उतरला की करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्यांच्याकडून खूप आशा असतात. त्याने एकट्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. सध्या तो टी-२० वर्ल्ड कपमध्ये रंगत आहे. सध्या त्याची बॅट जोरदार धावांचा पाऊल पाडत आहे. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत शानदार फलंदाजी केली असून आतापर्यंत ४ पैकी ३ सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – T-20 World Cup 2022 : वसीम अक्रमने पंचांवर ओढले ताशेरे; म्हणाला, ‘त्यांचे काम फक्त…’

विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द –

कोहलीने आतापर्यंत १०२ कसोटी, २६२ एकदिवसीय आणि ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्‍याच्‍या नावावर कसोटीमध्‍ये २७ शतके आणि २८ अर्धशतकांसह ८०७४ धावा आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांसह एकूण १२३४४ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि ३६ अर्धशतकं लगावत एकूण ३९३२ धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहलीने आयपीएलमध्ये २२३ सामन्यांत ५ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावताना ६६२४ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli on his favorite bollywood actress during his childhood days not anushka its karishma kapoor vbm