बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे सर्वात क्यूट कपल असल्याचं म्हटलं जातं. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. चाहत्यांना त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल चांगलेच माहिती आहे, परंतु त्यांच्या पहिल्या भेटीत काय झाले हे तुम्हाला माहिती आहे का? विराटने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्ससोबतच्या संभाषणात त्याची प्रेमकथा शेअर केली आहे. अनुष्कासोबतची पहिली भेट आणि कालांतराने त्यांची मैत्री कशी झाली याबद्दल त्याने सांगितले.
हेही वाचा- “माझ्यासमोर शाहरुख नाही टिकला, हा तर बिचारा…”; अभिनेत्याने उडवली कपिल शर्माची खिल्ली
विराट कोहलीने सांगितले की, तो पहिल्यांदा अनुष्का शर्माला एका जाहिरातीच्या शूटच्या सेटवर भेटला होता. त्यादरम्यान तो खूप घाबरला होता आणि पहिल्या संभाषणानंतर त्याला दुसऱ्यांदा अनुष्काशी बोलण्यात आराम वाटू लागला. काही भेटीनंतर दोघेही एकमेकांत मिसळू लागले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये डेटिंग सुरू झाली आणि २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले.
पहिल्या भेटीबद्दल बोलताना विराट कोहलीने सांगितले की, २०१३ मध्ये जेव्हा त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून निवड झाली होती, तेव्हा त्याचा मॅनेजर त्याच्याकडे आला आणि त्याने विराटला सांगितले की तुला अनुष्कासोबत शूट करायचे आहे, त्यावेळी विराटने हे ऐकले, तो खूप घाबरला होता. त्यावेळी अनुष्का एक प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि विराटला तिच्याशी संपर्क कसा साधायचा याची कल्पना नव्हती.
हेही वाचा- ..अन् शाहरुखने भर पार्टीत फराह खानच्या पतीच्या लगावली होती कानशिलात; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण
कशी होती विराट अनुष्काची पहिली भेट
विराटने सांगितले की, जेव्हा तो अनुष्काला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने घाबरलेल्या अवस्थेत तिच्यासोबत एक विनोद केला. त्याने अनुष्काच्या हाय हिल्सबद्दल प्रश्न विचारला, ज्याला अनुष्काने उत्तर दिले नाही आणि ‘माफ करा’ म्हणाली? अनुष्काच्या या प्रतिक्रियेनंतर विराट आणखीनच घाबरला. मात्र, काही वेळ एकत्र घालवल्यानंतर त्याला जाणवले की, अनुष्का खूप डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. बोलल्यावर दोघांचीही पार्श्वभूमी एकच असल्याचं समोर आलं. त्यानंतर ते दोघे मित्र बनले आणि हळूहळू एकमेकांना डेट करू लागले. मात्र, हे लगेच झाले नाही. या सर्व गोष्टींना वेळ लागला.
अनुष्का शर्माच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुष्का झुलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री तृप्ती दिमरी आणि बाबिल खान स्टारर ‘काला’ मधील एका गाण्यात शेवटची भूमिका करताना दिसली होती. याआधी ती शाहरुख खान आणि कतरिना कैफ स्टार ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती.