Virat Kohli Reaction on R Ashwin Retirement: गाबा कसोटी सामन्यात पावसामुळे खेळ थांबलेला असताना रवीचंद्रन अश्विनशी बोलताना विराट कोहली भावुक होत अश्विनला मिठी मारताना दिसला. दोघेही बराच वेळ एकमेकांशी चर्चा करत होते. यावरून अश्विन निवृत्ती जाहीर करणार का अशी चर्चा रंगली होती आणि गाबा कसोटी अनिर्णित राहिल्याचे जाहीर होताच पत्रकार परिषदेत अश्विनने निवृत्त होत असल्याचे सांगत सर्वांनाच धक्का दिला. अश्विनच्या निवृत्तीवर विराट कोहलीनेही भावुक होत प्रतिक्रिया दिली आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पिंक बॉल कसोटी सामना अश्विन खेळताना दिसला होता. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याऐवजी जडेजाला संधी देण्यात आली. मेलबर्न आणि सिडनीमध्ये त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता होती. पण तत्त्पूर्वी त्याने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला. त्याच्या निवृत्तीवर विराट कोहलीने एक्सवर पोस्ट केली आहे.

हेही वाचा – R Ashwin: ७६५ एकूण विकेट, मालिकावीर पुरस्कार, शतकं अन् बरंच काही… अश्विनच्या कारकिर्दीतील टॉप-१५ अनोखे विक्रम

हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा का केली?

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीवर बोलताना विराट म्हणाला, “मी १४ वर्षे तुझ्याबरोबर खेळलो आहे आणि तू आज निवृत्त होत आहेस हे मला सांगितलंस, तेव्हा मी थोडा भावूक झालो आणि एकत्र खेळतानाच्या त्या सर्व वर्षांच्या आठवणी चटकन माझ्या डोळ्यासमोर आल्या. तुझ्याबरोबर खेळतानाच्या प्रत्येक क्षणाच्या मी आनंद लुटला आहे अश्विन. भारतीय क्रिकेटमध्ये तुमचे कौशल्य आणि सामना जिंकण्यासाठीचं तुझं योगदान कोणापेक्षाही कमी नाही आणि तू नेहमी भारतीय क्रिकेटचा एक दिग्गज म्हणून ओळखला जाशील. तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला आणि तुझ्या प्रियजनांना खूप खूप प्रेम. प्रत्येक गोष्टीसाठी आभार मित्रा.”

Story img Loader