Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीने आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची विक्रमी खेळी केल्यानंतर, टी २० विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मालिकेत आता सलामीवीर रोहितसह विराट मैदानात उतरणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र रोहित शर्माने पत्रकार परिषदेत टी-२० विश्वचषकातील संघाची बांधणी सांगत या चर्चांना विराम दिला आहे.

रोहित शर्माने सांगितल्यानुसार, विश्वचषक तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा व के. एल. राहुल सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात उतरतील तर आणि तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा बॅकअप पर्याय असेल. अफगाणिस्तानविरुद्ध कोहलीच्या खेळीने हे सिद्ध केले की तो कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्यास तयार आहे परंतु याचा अर्थ असा नाही की केएल राहुलच्या कौशल्याकडे दुर्लक्ष करता येईल.

Video : बडबड्या पत्रकारावर रोहित शर्माचा मिश्किल पलटवार; पठ्ठ्याची बोलतीच बंद, तुम्हीच पाहा

विराटचा पर्याय निश्चितच..

‘पर्याय उपलब्ध असणे नेहमीच फायद्याचे असते. विश्वचषकात जाण्यासाठी तुमच्याकडे लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी कोणत्याही स्थितीत फलंदाजी करताना तयार असायला हवे. सर्व खेळाडूंची गुणवत्ता आणि ते संघासाठी काय कौशल्य घेऊन येतात हे जाणून मगच संघाची बांधणी केली जाते. विराट टीम इंडियामध्ये जरी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असला तरी त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत विराट हा पर्याय नक्कीच विचारात घेतला जाईल” असेही पुढे रोहित म्हणाला.

दरम्यान, रोहितच्या कमेंटमनंतर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना खेळवताना प्रयोग केले जाणार का या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. कारण भारताच्या कर्णधाराने स्पष्टपणे नमूद केले की कोहलीशिवाय इतर कोणाचाही बॅकअप पर्याय म्हणून विचार केलेला नाही.

Story img Loader