धावा करण्यातले अद्भुत सातत्य, प्रत्येक सामन्यागणिक धावांची वाढणारी भूक, संघाच्या विजयात निर्णायक योगदान या सगळ्या मुद्दय़ांमुळे विराट कोहली भविष्यातील सचिन तेंडुलकर अशी वर्णने होऊ लागली. लहान वयातच कोहलीने घेतलेली भरारी पाहता, सचिनचे विक्रम मोडण्यासाठी तोच लायक उमेदवार आहे, अशा चर्चाही रंगू लागल्या.
कोहली प्रतिसचिन होणार का, हे येणारा काळच ठरवील. मात्र ट्विटरवर मात्र कोहलीने सचिनला मागे टाकले आहे. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या क्रीडापटूंच्या यादीत कोहलीने सचिनला मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे.
भारतीय संघाचे रनमशीन अशी बिरुदावली मिळवलेल्या आणि युवा वर्गात लोकप्रिय कोहलीच्या ट्विटर हॅण्डलवरील फॉलोअर्सची संख्या ४, ८७०, १९० एवढी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४, ८६९, ८४९ फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानी आहे. ऑक्टोबर महिन्यात कोहलीने चार लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ३, ३२७, ०३३ फॉलोअर्ससह सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. वीरेंद्र सेहवाग (३१८००८१) युवराज सिंग (२७२३०९०) तर सुरेश रैना (२६१७८२८) हेही फॉलोअर्सची पसंतीचे आहेत.
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या अव्वल दहा क्रीडापटूंमध्ये नऊ क्रिकेटचेच आहेत, अपवाद टेनिसपटू सानिया मिर्झाचा. सानिया या यादीत सातव्या स्थानी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा