सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जात आहे. या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला आहे. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. अशा प्रकारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विश्वविक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीने दिल्लीच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ८वी धाव घेताच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २५ हजार धावा करणारा ठरला. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ५७७ डावात ही कामगिरी केली होती, तर आता विराट कोहलीने ५४९व्या डावात ही कामगिरी केली.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ५८८ डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५००० धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा विराट कोहली जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी २५ हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Ranji Trophy 2023 Final: सौराष्ट्र संघ पुन्हा ठरला रणजी चॅम्पियन; जयदेवच्या नेतृत्वाखाली बंगालचा ९ विकेट्सने उडवला धुव्वा

विराट कोहलीच्या तिन्ही फॉरमॅटमधील धावा –

विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२८०९ धावा केल्या आहेत, तर वृत्त लिहिपर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८१९० धावा केल्या आहेत. याशिवाय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या बॅटने ४००८ धावा निघाल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli overtook sachin tendulkar to become the fastest to reach twenty five thousand runs in international cricket vbm
Show comments