Virat Kohli Ranji Trophy 2025 Match : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १३ वर्षांनंतर आज म्हणजेच गुरुवारी रणजी क्रिकेट खेळणार आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची बातमी आधीच वणव्यासारखी पसरली आहे. आता त्याचा परिणाम सामन्याच्या दिवशीही दिसून येत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमबाहेर सकाळपासूनच क्रिकेट चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिल्लीतील लोक आपल्या आवडत्या विराटचे वादळ पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टेडियमबाहेर चाहत्यांच्या लांबच लांब रांगा –

आता विराट विराट आहे. तो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याची फॅन फॉलोइंगचा प्रचंड आहे आणि याचाच परिणान म्हणून अरुण जेटली स्टेडियमबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमलेली दिसली. चाहत्यांच्या गर्दीचे मुख्य कारण म्हणजे विराटला खेळताना मोफत पाहण्याची संधी आहे. कारण या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. ज्यामुळे चाहत्यांनी दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लावल्या आहेत याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२०१२ नंतर विराटचे रणजीमध्ये पुनरागमन –

विराट कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१२-१३ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो प्रथमच या प्रतिष्ठेच्या देशांतर्गत स्पर्धेत दिसणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीचा सामना रेल्वेशी होत आहे. विराट कोहलीचा हा २४वा रणजी सामना असेल. याआधी झालेल्या २३ सामन्यांमध्ये त्याने ५ शतके आणि ५० पेक्षा जास्त सरासरीसह १५४७ धावा केल्या आहेत.

५६ चौकार, ५३१ धावा.. ‘विराट’चा दिल्लीत विक्रम –

विराट कोहली त्याचा रणजीचा पुनरागमन सामना त्याच्याच घरच्या मैदानावर खेळणार आहे. अशा परिस्थितीत विराटचा रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटीतील रेकॉर्ड काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विराटने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आतापर्यंत ४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ८ डावात ६६.३७ च्या सरासरीने ५३१ धावा केल्या आहेत. या काळात विराटच्या बॅटमधून ५६ चौकार आले आहेत. पण मोठी गोष्ट म्हणजे त्याने एकही षटकार मारला नाही.