भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघ सहकाऱ्यांबरोबर जोरदार तयारी करत आहे. तर दुसरीकडे त्याच्या पत्नीचा म्हणजेच अनुष्काचा झिरो हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत नसला प्रेक्षकांना तो म्हणवा तितकासा आवडला नसला तरी आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या अनुष्कावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांचीही प्रमुख भूमिका असणाऱ्या सिनेमाची कथा उत्तरार्धात भरकट गेल्याची टिका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सिनेमा ‘फ्लॉप’ असल्याचे म्हटले जात आहे. नेटकऱ्यांनी सिनेमातील कलाकारांना सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केले आहे. असे असतानाच विराटने मात्र आपल्याला सिनेमा आवडल्याचे ट्विट केले आहे.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असणाऱ्या विराटने ट्विट करुन आपल्या पत्नीच स्तुती केली आहे. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘झिरो सिनेमा पाहिला. मस्त मनोरंजन झाले. सिनेमा पाहताना मज्जा आली. सर्वांनी छान अभिनय केला आहे. अनुष्काचा अभिनय विशेष आवडला कारण तिने आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. उत्तम अभिनय केलाय तिने.’

मात्र विराटच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. सिनेमा चांगला नसतानाही केवळ पत्नीने भूमिका केलेला सिनेमा आहे म्हणून तो स्तुती करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने विराटच्या चाहत्यांनी तरी हा सिनेमा पाहावा म्हणून त्याने असं ट्विट केले आहे. या सर्वांमध्ये भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या पॅरडी (नकली) अकाऊण्टवरून कऱण्यात आलेल्या ट्विटची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. पाहुयात कशाप्रकारे नेटकऱ्यांनी पत्नीची स्तृती करणाऱ्या विराटला केले आहे ट्रोल

अनुष्का वापरतेय विराटचं ट्विटर

बायकोची भिती

नाही विराट खरं सांग तू खोटं बोलतोयस

असं झालं तर

… पण सिनेमा थर्ड क्लास होता

चला कोणाला तरी आवडला सिनेमा

लडकी का चक्कर बाबू भय्या

…आणि तू म्हणतो सिनेमा चांगला आहे

वहिनीचं काम सोडून बाकी काहीतरी सांगा

भावा पासवर्ड बदल

सिनेमा अगदी आपल्या सलामीच्या फलंदाजांसारखा आहे

तू झिरोवर बाद होऊ नकोस म्हणजे झालं…

हो के. एल. राहुललाही झिरो आवडतो

हवं तर क्रिकेट पाहतो पण…

आपल्या संघातील ओपनर्सला हा सिनेमा दाखवू नका

दरम्यान बड्या पडद्यावर झिरोची परिस्थिती दिवसोंदिवस बिकट होताना दिसत आहे. झिरो हा नाताळाच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला सर्वात कमी कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये भारत ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार असून १-१ अशी बरोबरीत असणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील.

Story img Loader