भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वन-डे मालिकेतला पहिला सामना हा दम्बुल्लाच्या मैदानावर होणार आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे ९ वर्षांपूर्वी याच मैदानावर कोहलीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या ९ वर्षात कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक बदल झालेले पहायला मिळाले. एक तरुण खेळाडू ते भारतीय संघाचा कर्णधार हा प्रवास विराट कोहलीने या ९ वर्षांमध्येच अनुभवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत आपल्या खेळीने कोहलीने आपलं महत्व वारंवार सिद्ध केलेलं आहे. अनेक नवीन विक्रम आपल्या नावे करत, अनेक दिग्गज खेळाडूंच्या नावे असलेले विक्रम कोहलीने मोडले आहेत. यावेळी विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक खास फोटो शेअर केला.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेच्या संघावर ३-० अशी मात करत कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. त्यामुळे आता आगामी वन-डे मालिकेत भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

अवश्य वाचा – वन-डे क्रमवारीत विराट कोहली ‘किंग’ !