भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली ३४ वर्षांचा झाला असला तरी तो अजूनही तंदुरुस्त आहे. कोहली त्याच्या उत्कृष्ट शॉट्ससोबतच क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मात्र काही काळापासून विराट सातत्याने झेल सोडत असल्याने त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही कोहलीने स्मिथचा सोपा झेल सोडला, तेव्हा असेच दृश्य पाहायला मिळाले. यासोबतच विराटने एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरेतर, दोन विकेट्स गमावल्यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अक्षर पटेलने येताच दोन्ही फलंदाजांना त्रास देण्यास सुरुवात केली. डावाच्या १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्मिथला चकवा दिला. त्याचा चेंडू थेट स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीवर गेला. मात्र, कोहलीला योग्य वेळी खाली वाकता आले नाही आणि चेंडू हाताला लागून जमिनीवर पडला.

अशा प्रकारे स्टीव्ह स्मिथला जीवनदान मिळाले. विराट कोहलीने सोडलेला हा १०० वा झेल होता. त्यामुळे त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. यासह तो १०० झेल सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: मैत्री असावी तर अशी…! रोहित शर्मा प्यायला मोहम्मद सिराजचे उष्टं पाणी, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मार्नस लाबुशेनने केल्या. त्याने ४९ धावांचे योगदान दिले. तसेच भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर आश्विनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli recorded an embarrassing record while he dropped steve smiths catch vbm