भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा युवा फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी विराट कोहली दुसऱ्या स्थानी होता. मात्र कोहलीने आशिया चषकातील तीन सामन्यांमध्ये १८९ धावा करत १२ क्रमवारी गुणांची कमाई करत अव्वल स्थानी कब्जा केला होता. अन्य भारतीय फलंदाजांमध्ये शिखर धवन, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आगेकूच केली आहे. धवन ११वरून ८व्या तर रोहित २३वरून २२व्या आणि जडेजा ६२वरून ५०व्या स्थानी स्थिरावले आहेत.

Story img Loader