Virat Reveals What He Was Thinking Haris rucial Over : टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३१धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. येथून विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारताने हा विजय नोंदवला.

या सामन्यात, विराट कोहलीने १९व्या षटकात हरिस रौफला मारलेल्या सलग दोन षटकारामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. या सामन्यात आणि हारिस रौफच्या त्या षटकात विराट कोहलीच्या मनात काय चालले होते, याबाबत किंग कोहलीने आता एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”

स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात जतीन सप्रूशी बोलताना विराट म्हणाला, “एवढ्या लवकर चार विकेट पडतील, असे वाटले नव्हते. अक्षर धावबाद झाल्यावर मी त्याची माफी मागितली. कारण तो माझ्यामुळे बाद झाला. काय होत आहे ते मला समजत नव्हते, ४५ धावांवर ४ आऊट झाले आहेत, मी २१ चेंडूत फक्त १२ धावा करून खेळत आहे. जेव्हा हार्दिक क्रीझवर आला, तेव्हा मी त्याला फक्त भागीदारी करायला सांगितले, सामना शेवटपर्यंत घेऊन जायचे ठरवले आणि हळूहळू वेग येत गेला.”

हेही वाचा – IND vs AFG : विमानात झोपलेल्या रिंकू सिंगची अफगाणिस्तानच्या खेळाडूने घेतली मजा, VIDEO होतोय व्हायरल

१९व्या षटकाच्या आधी विराट काय विचार करत होता?

अंतिम फेरीत भारताला विजयासाठी दोन षटकांत ३१ धावांची गरज होती. विराट आणि हार्दिक क्रीझवर होते, पण समोर हरिस रौफ होता. जतीन सप्रूने विचारले की, त्या क्षणी तुमच्या मनात काय चालले होते, यावर विराट म्हणाला, “तुम्हाला या षटकात २० धावा याव्यात, पण वास्तव हे आहे की त्या सामन्यात त्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. तो १४५ च्या वेगाने गोलंदाजी करतो, चांगले बाउन्सर टाकतो, स्लोअर बॉल देखील आश्चर्यकारकपणे टाकतो, यॉर्कर देखील चांगला आहे. त्यामुळे एखाद्याच्या मनात एक लक्ष्य असते पण नंतर हे देखील माहित असते की, आपल्याला जे करायचे आहे, ते समोरचा आपल्याला देणार नाही कारण त्याच्याकडे कौशल्य आहे.”

हेही वाचा – कोण आहे जम्मू-काश्मीरचा पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोन? ज्याच्या व्हिडीओने सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित

‘चिकू, आता तुला दोन षटकार मारावेच लागतील’

या षटकातील पहिल्या चार चेंडूत केवळ तीन धावा झाल्या होत्या आणि समीकरण पूर्णपणे बदलले होते. त्यावेळी, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अल्गोरिदमनुसार, टीम इंडियाच्या विजयाची अपेक्षा केवळ ३.१% होती. पण यानंतर विराटने हारिसला सलग दोन षटकार मारले. यावर विराट म्हणाला, ‘त्यावेळी मी स्वतःशी बोलत होतो की, चिकू,आता तुला दोन षटकार मारावेच लागतील.’ रौफच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विराटने मारलेल्या नेत्रदीपक शॉटबद्दल तो म्हणतो, ‘मला माहित होते की एक सिंगल तर नक्कीच येईल, म्हणून मी अशीच क्रीजमधून बाहेर निघालो होतो. आता जरी मी माझ्या स्वप्नात या शॉटबद्दल विचार केला, तरी मी तो इतका परिपूर्ण बनवू शकत नाही.’

Story img Loader