भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. त्याने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळला. त्यानंतर अद्याप तो क्रिकेटच्या मैदानात परतलेला नाही. करोनामुळे भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजन अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे. या स्पर्धेत आपली चमक दाखवून टीम इंडियात कमबॅक करण्याची धोनीकडे चांगली संधी आहे असे बोलले जात होते. पण सध्या तरी ते शक्य होताना दिसत नाही. धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कठीण दिसत असलं, तरीही ‘विराट, रोहितने धोनीचा आदर्श घ्यावा आणि युवा खेळाडूंना धोनीसारखं मार्गदर्शन करावं’ असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त केलं आहे.

मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी एलिस पेरीने ठेवली एक अट

गौतम गंभीरने स्पोर्ट्सतकच्या लाईव्ह कार्यक्रमात बोलताना धोनीबाबत वक्तव्य केलं. “सध्याच्या पिढीतील शुभमन गिल, संजू सॅमसन यांसारख्या युवा खेळाडूंना आमच्या काळात मिळत असलेल्याप्रमाणे सहकार्य मिळत असेल अशी मी आशा करतो. रोहित शर्मा हा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याने युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करावं असं मला मनापासून वाटतं. खेळाडूला योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला तर खेळाडू किती चांगला क्रिकेटपटू बनू शकतो याचे रोहित हा एक उत्तम उदाहरण आहे. धोनीने रोहितवर कायम विश्वास दाखवला. तो संघात नसताना देखील संघाच्या मिटींगमध्ये आणि चर्चांमध्ये त्याने रोहितला कायम सोबत ठेवले. धोनीने कधीही त्याला बाजूला केले नाही. अशाच पद्धतीची अपेक्षा मला विराट आणि रोहितकडून आहे. या दोघांकडे अनुभव आणि प्रतिभा आहे. त्यांनी धोनीप्रमाणे नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करायला हवे”, अशी अपेक्षा गंभीरने व्यक्त केली.

क्रिकेटपटूच्या घरी ‘नन्ही परी’चे आगमन; सोशल मीडियावरून दिली ‘गुड न्यूज’

रोहित शर्माच्या जडणघडणीत धोनीचा मोठा वाटा आहे. त्याबाबतही गंभीरने मत मांडले. “रोहित आज ज्या ठिकाणी पोहचला आहे, त्याचं श्रेय धोनीला जातं. तुम्ही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाबद्दल बोलू शकता, पण जोपर्यंत तुम्हाला कर्णधाराचा पाठींबा नसेल, तोपर्यंत काहीच उपयोग नसतो. सर्व काही कर्णधाराच्या हातात असतं. धोनीने आपल्या काळात नेहमी रोहित शर्माला पाठींबा दिला. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही खेळाडूला इतका पाठींबा मिळाला नसेल”, असे गंभीरने सांगितले.

Story img Loader