ICC Rankings: आयसीसीने विश्वचषक संपल्यानंतर पहिली एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय खेळाडूंना याचा मोठा फायदा झाला. टीम इंडियाच्या तीन फलंदाजांचा पहिल्या चारमध्ये समावेश आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली शीर्षस्थानी पोहोचण्याच्या जवळ आला आहे. याबरोबरच रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल पहिल्या तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आणि कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.
कोहलीने वर्ल्डकपमध्ये ७६५ धावा केल्या होत्या. यामुळे त्याला एका स्थानाचा फायदा झाला. तो आता अव्वल मानांकित शुबमनपेक्षा केवळ ३५ रेटिंग गुणांनी मागे आहे. गिलचे ८२६ रेटिंग गुण आहेत. त्याची बाबर आझमबरोबर लढत सुरु आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या खात्यात ८२४ रेटिंग गुण आहेत. कोहलीचे ७९१ तर रोहित शर्माचे ७६९ रेटिंग गुण आहेत. कोहलीने वर्ल्ड कपमध्ये तीन शतके झळकावली होती. सचिन तेंडुलकरचा वन डेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रमही त्याने मोडला. त्याचवेळी रोहित शर्माने या स्पर्धेत संघासाठी ५९७ धावा केल्या. शुबमन गिलने ३५४ आणि बाबर आझमने ३२० धावा केल्या. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही.
कोहली १२५८ दिवस अव्वल स्थानावर राहिला होता
कोहलीने २०१७ ते २०२१ या कालावधीत जवळपास १२५८ दिवस तो या प्रथम क्रमांकावर राहिला होता. अलीकडच्या काळात बाबरने आपला बराचसा वेळ शीर्षस्थानी घालवला आहे. त्याला शुबमन गिलने पहिल्या स्थानावरून धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन-डी-कॉक वनडे क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून पाचव्या स्थानावर आला आहे मात्र, तो निवृत्त झाला आहे. त्याचवेळी, न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेलने विश्वचषक स्पर्धेत ५५२ धावांसह पाच स्थानांची प्रगती करत सहावे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा: Team India: टी-२० विश्वचषकात रोहित-विराट पुनरागमन करणार? आयपीएलमधील कामगिरीनंतर घेणार निर्णय
ट्रॅविस हेडला मोठा फायदा झाला
एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात मोठा फायदा ट्रॅविस हेडला झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीर फलंदाजाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले होते. आयसीसी क्रमवारीत २८ स्थानांची झेप घेत तो १५व्या स्थानावर पोहोचला आहे.
केशव महाराज प्रथम क्रमांकावर आहेत
गोलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी त्यांच्या यशस्वी विश्वचषक मोहिमेनंतर चांगले नशीब कमावले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने चार स्थानांनी प्रगती करत दुसऱ्या स्थानावर, त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आठ स्थानांनी प्रगती करत १२व्या स्थानावर, तर कर्णधार पॅट कमिन्सने सात स्थानांनी प्रगती करत २७वे स्थान पटकावले आहे.
हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये कशी असेल भारताची प्लेइंग-११? जाणून घ्या
कुलदीप यादवचे नुकसान झाले
मोहम्मद सिराज तिसऱ्या आणि जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. त्याचवेळी त्याचा सहकारी कुलदीप यादव एका स्थानाने घसरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. विश्वचषकाच्या समारोपाच्या वेळी अष्टपैलू खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या दहामध्ये फारसा बदल झालेला नाही. बांगलादेशच्या अनुभवी शाकिब-अल-हसन आघाडीवर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर दोन स्थानांनी घसरून सातव्या स्थानावर तर, बांगलादेशचा मेहदी हसन मिराज दोन स्थानांनी घसरून नवव्या स्थानावर पोहोचला आहे.