गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यावर अखेर पडदा पडला आहे. भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उरलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विराट कोहलीनं त्याच्या अनुपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाला व निवड समितीला कळवलं आहे. वैयक्तिक कारणामुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याचं विराटनं नमूद केलं आहे. त्यामुळे पदार्पणानंतर आजतागायत घरच्या मैदानावरच्या कसोटी मालिकेत विराट पहिल्यांदाच खेळणार नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवड समिती सदस्यांची शुक्रवारी उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडीबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीआधी विराट कोहलीनं बीसीसीआयला त्याच्या अनुपस्थितीबाबत कळवल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. कसोटी मालिकेतील उर्वरीत तीन सामने राजकोट, रांची आणि धरमशाला या ठिकाणी होणार आहेत. आता विराट कोहली व श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत उर्वरीत तीन सामन्यांसाठी भारतीय संघ नेमका कसा असेल? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मालिका सुरू होण्यापूर्वी विराटची रोहित शर्माशी चर्चा

दरम्यान, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीनं रोहित शर्मा व संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. वैयक्तिक कारणांसाठी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी अनुपस्थित राहणार असल्याचं त्यानं कळवलं होतं. मात्र आता उरलेल्या तिन्ही सामन्यांमधून माघार घेत असल्याचं त्यांन स्पष्ट केलं आहे. “बीसीसीआय विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करते. संघ व्यवस्थापन व बीसीसीआयचा विराटच्या निर्णयाला पाठिंबा आहे. भारताच्या उर्वरीत संघाच्या क्षमतांवर बीसीसीआयला पूर्ण विश्वास आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली आहे.

कसोटी मालिकेत किमान तीन सामने आवश्यक; मेरिलीबोन क्रिकेट समितीची शिफारस

श्रेयस अय्यरही मालिकेतून बाहेर

दरम्यान, विराट कोहलीपाठोपाठ भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हाही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या त्याच्यावर उपचार चालू असून त्याच्या सुधारणेवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.