दुबई : भारतीय संघातील यशस्वी अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अपयशी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मिळविलेल्या या विजयाने पुन्हा एकदा एक संघ म्हणून आमचा आत्मविश्वास दुणावल्याचे सांगितले.
विजेतेपदाच्या आनंदात आठवणींना उजाळा देताना कोहलीने ‘आयसीसी’ स्पर्धेच्या बाद फेरीत यापूर्वी झालेल्या पराभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळेच नऊ महिन्यांत आम्ही दोन ‘आयसीसी’ स्पर्धेची विजेतीपदे मिळवू शकलो, असे सांगितले.
‘‘संपूर्ण स्पर्धेत वेगवेगळ्या खेळाडूंनी आपले भरीव योगदान दिले जे महत्त्वाचे होते. मागील काही स्पर्धांत असे क्षण होते की, आम्ही आमची मोहीम पूर्णत्वाला नेऊ शकलो नव्हतो. हे असे अनुभवच आपल्याला शिकवत असतात. त्यातूनच धडा घेत आम्ही या वेळी आमचे ध्येय गाठले,’’ असेही कोहली म्हणाला.