Virat Kohli AI video viral on social media : क्रिकेटच्या खेळात खेळाडूंची तुलना दिग्गजांशी केली जाते. विराटची तुलना सचिनशी, तर शुबमन गिलची तुलना विराट कोहलीशी केली जाते. आता विराटचा कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो शुबमन गिलची त्याच्याशी तुलना करण्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विराट स्वत:ला सचिन तेंडुलकरनंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणताना दिसत आहे. मात्र, आता या व्हिडीओचे सत्य काय आहे? ते समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली म्हणतो, ‘जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाहून परतलो, तेव्हा मी यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचे आकलन केले. शुबमन गिलला मी जवळून पाहत आहे. त्याच्या टॅलेंटबद्दल शंका नाही पण ‘टॅलेंट शो’ करणं आणि ‘लीजंड बनणं’ यात खूप फरक आहे. ती उंची गाठणे शुबमन गिलसाठी खूप अवघड आहे.’

सध्याच्या घडीला एआय चांगलंच फोफावलं आहे, विविध व्हीडिओ, फोटो, आवाजही एआयने जनरेट केले जातात. तसाच हा विराट कोहलीचा व्हायरल झालेला व्हीडिओ आहे. विराट कोहलीचा व्हायरल होत असलेला हा व्हीडिओ एआय जनरेटेड आहे. व्हायरल व्हीडिओमधील विराटची जी मुलाखत आहे ती शुबमन गिल जेव्हा संघाचा भागही नव्हता तेव्हाची आहे. त्यामुळे विराट कोहली स्वत: शुबमन गिलबद्दल किंवा त्याच्या कामगिरीबद्दल काहीच बोलला नसून हा व्हीडिओ फेक आहे.

‘शुबमन गिलचे तंत्र उत्कृष्ट’ –

विराट कोहली पुढे म्हणतो, ‘गिलचे तंत्र उत्कृष्ट आहे, पण मी हे स्पष्ट करतो की त्याची माझ्याशी तुलना करण्याची गरज नाही. लोक त्याला भावी विराट कोहली म्हणत आहेत, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की एकच विराट कोहली आहे. मी सर्वात धोकादायक गोलंदाजांचा सामना केला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच एक दशकाहून अधिक काळ सातत्याने असे केले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एक ‘देव’ (सचिन तेंडुलकर) आहे आणि त्याच्यानंतर मी आहे. हा एक बेंचमार्क सेट केला आहे. गिलला तिथे पोहोचण्याआधी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.’

हेही वाचा – Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”

एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेला व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अगदी खरा वाटतो. कारण यामध्ये विराट कोहलीचा आवाज आणि तो बोलतानाही दिसत आहे. मात्र, ते एआयच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनेक यूजर्स एआयच्या क्षमतेवर आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि ते किती धोकादायक आहे ते सांगत आहेत. विराट कोहलीने असे कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. हा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli said that shubman gill cannot be compared to us ai generated video viral on social media vbm