भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एका कार्यक्रमादरम्यान एक खुलासा केला आहे. त्याने मोहम्मद सिराजच्या कारकिर्दीशी संबंधित एका घटनेबद्दल सांगितले. ज्याने मोहम्मद सिराजच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना अनेक युवा खेळाडूंनी भारतासाठी पदार्पण केले आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करून ते संघाचे नियमित सदस्यही झाले. मात्र, काही खेळाडूंना संघातील स्थान कायम राखणे सोपे नव्हते. ज्यामध्ये मोहम्मद सिराजचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले आहे.

सिराजने आयपीएल फ्रँचायझी आरसीबीसाठी पदार्पण केले, त्यानंतर तो भारतीय कर्णधार आणि त्याचा सहकारी विराट कोहली यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाला. त्याच वर्षी तो भारतीय संघासाठी पदार्पण करू शकला. पण लवकरच सिराजलाही आपले स्थान गमवावे लागणार होते. कारण तो सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला होता. दरम्यान, त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आणि कसोटी संघात स्थान मिळवले. दिनेश कार्तिकने सांगितले की, या सगळ्यात विराट कोहली सिराजला सपोर्ट करत राहिला.

हेही वाचा – Akash Chopra: ‘बहुत दूर जाएगा ये खिलाडी’; ‘या’ चिमुरड्याचा आकाश चोप्राही झाला फॅन, पाहा VIDEO

तो ड्रॉप होणार होता, पण कोहलीने त्याला पाठिंबा दिला –

दिनेश कार्तिक क्रिकबझच्या विशेष शो ‘राइज ऑफ न्यू इंडिया’मध्ये म्हणाला, “त्याने २०२० मध्ये आरसीबीसाठी महामारीनंतर खूप चांगली कामगिरी केली. जेव्हा तो आला होता. तेव्हा तो ड्रॉप होणार होता. पण विराट कोहलीने त्याला पाठिंबा दिला आणि म्हणाला, ‘मला तो प्लेइंग इलेव्हनमध्ये हवा आहे’.”

हेही वाचा – Saudi Arabia Foundation Day: सौदीच्या पारंपारिक पोशाखात तलवारी घेऊन नाचताना दिसला Cristiano Ronaldo, पाहा VIDEO

त्याची एक यशोगाथा आहे –

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “त्याने कोरोना महामारीनंतर २०२० मध्ये आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली. त्याचा माझ्याशी काही संबंध होता, कारण मी केकेआर संघाचा भाग होतो, जो १०० धावांवर सर्वबाद झाला होता. ज्यामध्ये तो तीन विकेट घेऊन सामनावीर ठरला. तिथून त्याच्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यामुळे जिथून तो खूप आत्मविश्वास आणि आयुष्यात चांगले करण्याची इच्छा घेऊन आला आहे, ते पाहून बरे वाटले. त्याची एक यशोगाथा आहे. ज्यातून अनेकजण प्रेरणा घेऊ शकतात.”

Story img Loader