Virat Kohli, Saurav Ganguli On Mohammad Shami: विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. भारताच्या या विक्रमी विजयात कोहलीच्या शतकासह भारताच्या भेदक गोलंदाजीने सुद्धा सर्वांना थक्क केले. विश्वचषकात पॉईंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकी संघाला भारताने अवघ्या ८३ धावांमध्ये पूर्ण बाद केले होते. मोहम्मद सिराज, जडेजा, कुलदीप यादव सह कालच्या सामन्यात पुन्हा एकदा मोहम्मद शमीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात शमीने चार षटकांत केवळ १८ धावा देत दोन बळी घेतले होते.

इंडियन एक्सस्प्रेसच्या वृत्तानुसार, ईडन गार्डन्सवर होणाऱ्या मोठ्या खेळापूर्वी, कोहलीने त्याचा अंडर-१९ संघातील सहकारी श्रीवत्स गोस्वामी याची भेट घेतली. यानंतर गोस्वामी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने जसप्रीत बुमराहपेक्षा शमीचा सामना करणे किती कठीण आहे याविषयी दिलेले स्पष्टीकरण सांगितले.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “

गोस्वामी म्हणाले की, “शमीला सामोरे जाणे इतके कठीण का आहे हे विराटने मला समजावून सांगितले. शमी गोलंदाजी करताना बोटांनी लहानसा बदल करतो. जसप्रीत (बुमराह) समोर एकवेळ फलंदाज वाचू शकतात. परंतु शमीच्या समोर तुम्हाला माहित नसते की कोणता चेंडू कसा आत येत आहे आणि कुठे जात आहे.

हे ही वाचा<< “मोहम्मद शमीला गोलंदाज वसीम अक्रमने केलं, त्यावेळी..”, शमीच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितला IPL चा ‘तो’ किस्सा

विराटचे म्हणणे खरे आहे. मला शमीला नेटमध्ये सामोरे जावे लागले आहे. तो आमच्यासह प्रशिक्षण घेत होता. दादा (सौरव गांगुली) देखील तिथे उपस्थित होते आणि शमीला प्रशिक्षकांनी बाउन्सर टाकू नको असे कठोरपणे सांगितले होते. पण शमी भाऊ प्रत्येक सहा-सात चेंडूंनंतर एक-दोन बॉल बाउन्सर टाकत होता. मला आठवते दादा इतके उत्साहित होते की त्यांनी नंतर शमीला सहा चेंडूत तीन बाऊन्सर टाकण्यासाठी हिरवा कंदील दिला.”

Story img Loader