भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची केमिस्ट्री आपण कायमच पाहिली आहे. या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांना दोन वर्षांपूर्वीच एक मुलगी झाली. विराट कोहलीने अनुष्काचं खूप कौतुक केलं आहे. अनुष्का ही आई म्हणून आदर्श व्यक्त आहे. तसंच तिने मुलीसाठी अनेक प्रकारचा त्याग केला आहे असं म्हणत विराटने तिच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे.
काय म्हटलं आहे विराट कोहलीने?
मला विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत जे यश मिळालं आणि मी जो खेळ करु शकलो त्यामागे माझी पत्नी म्हणजेच अनुष्का शर्मा हीच आहे. माझ्या यशाचं श्रेय मी तिलाच देईन. Wrogn ला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने अनुष्काबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. तसंच अनुष्का आई झाल्यानंतर मुलीला सांभाळणं आणि करिअर सांभाळणं हे ज्या पद्धतीने करते आहे त्यासाठी मला तिचं कौतुक वाटतं. अनुष्का ही एक आदर्श आई आहे. अनुष्का आई झाल्यापासून तिच्यात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली आहे. तिने ज्या पद्धतीने आपलं करिअर आणि आईची जबाबदारी यांची सांगड घातली हे पाहून मी थक्क झालो.
अनुष्काचा त्याग मोठा
आम्हाला मुलगी झाल्यानंतर अनुष्काने तिची आई म्हणून जी जबाबदारी आहे ती समर्थपणे सांभाळली. सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाही अनुष्काने ज्या पद्धतीने आमच्या मुलीला सांभाळलं ते सोपं नाही. तिने ज्या पद्धतीने गोष्टी आत्मसात केल्या त्या सोप्या नाहीत. जो त्याग तिने केला तो खरंंच मोठा आहे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुम्ही आई होताना पाहता तेव्हाच तुम्हाला त्या व्यक्तीच्या वेगळ्या उर्जेची जाणीव होते.
अनुष्काकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. सत्याची साथ सोडायची नाही हे मी अनुष्काकडूनच शिकलो आहे. मला तिने हे शिकवलं आहे की जर आपण खरे असू तर आपल्याला जगाची पर्वा करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आपण सच्चे आहोत तेव्हा कुठल्याही कठीण समस्येतून मार्ग निघतोच. शिवाय सत्य जेव्हा इतरांसमोर येतं तेव्हा त्यांनाही वस्तुस्थिती समजतेच. असंही विराटने या मुलाखतीत म्हटलं आहे. विराटने आत्तापर्यंत अनेकदा अनुष्काची तारीफ केली आहे. ११ डिसेंबर २०१७ या दिवशी विराट आणि अनुष्काने लग्न केलं. तर २०२१ मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं आहे.