Virat Kohli 7th Test century in Australia : यशस्वी जैस्वालनंतर विराट कोहलीनेही पर्थ कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून नवा इतिहास लिहिला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीनंतर कोहलीने शानदार पद्धतीने शतक पूर्ण केले. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक 143 चेंडूत पूर्ण केले. अशा प्रकारे कोहलीने गेल्या 1 वर्ष 4 महिन्यांपासून सुरू असलेला शतकाचा दुष्काळ संपवला. कोहलीचे मागील शतक वेस्ट इंडिजविरुद्ध जुलै 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे झाले होते. आता या शतकाच्या जोरावर विराट कोहलीने सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे .
भारताने दिले ५३४ धावांचे ऐतिहासिक लक्ष्य –
भारताने दुसऱ्या डावात विराट कोहलीचीचया शतकाच्या जोरावर 6 बाद 487 धावा करून डाव घोषित केला. विराट कोहलीच्या शतकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विराटने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले.टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत अखेर आपले 81 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे.
विराटने सचिन तेंडुलकरसह डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे –
विराट कोहली आता ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोहलीने जॅक हॉब्सचा 9 शतकांचा विक्रम मोडला. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात कांगारू संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 10 शतके आहेत. इतकेच नाही तर कोहलीने सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत महान ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमनलाही मागे टाकले आहे. ब्रॅडमनने 29 कसोटी शतके झळकावली होती तर कोहलीच्या नावावर आता 30 कसोटी शतके आहेत.
हेही वाचा – Rishabh Pant : शिकारीच झाला शिकार! नॅथन लायनने टाकलेल्या जाळ्यात पद्धतशीरपणे अडकला ऋषभ पंत, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे भारतीय –
- 7 – विराट कोहली*
- 6 – सचिन तेंडुलकर
- 5- सुनील गावस्कर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार शतक झळकावून ही मोठी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांबद्दल बोलायचे झाले, तर विराट कोहलीच्या नावावर आता 81 शतके आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या यादीत विराट कोहली 81 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग 71 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीच्या षटकाराने सीमारेषेवरील सुरक्षारक्षक घायाळ, डोके धरून बसल्याचा VIDEO व्हायरल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –
- सचिन तेंडुलकर (भारत) – 100 शतके
- विराट कोहली (भारत) – 81 शतके
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतके
- कुमार संगकारा (श्रीलंका) – 63 शतके
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62 शतके