Virat Kohli Shares Alan Watts Quote: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ना एक गोष्ट शेअर करत आहे. भारतीय संघाला डब्ल्यूटीसी फायनल २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर कोहलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी केली, जी व्हायरल झाली होती. आता त्याने आणखी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
यावेळी कोहलीने इंग्रजी लेखक ‘अॅलन वॉट्स’चा एक कोट शेअर केला आहे. त्यामध्ये लिहले आहे की, “परिवर्तनातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यात बुडणे, त्याच्याबरोबर पुढे जाणे आणि नृत्यात सामील होणे.” कोहलीने काही वेळापूर्वी ही स्टोरी शेअर केली आहे.
यापूर्वी विराट कोहलीने शेअर केली होची इन्स्टा स्टोरी –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर, कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक कोट शेअर केला होता, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “शांतता हा महान शक्तीचा एक अद्भुत स्त्रोत आहे.”
हेही वाचा – Test Cricket: सौरव गांगुलीने हार्दिक पांड्याला केले आवाहन; म्हणाला, “त्याने…”
कोहली फायनलमध्ये अपयशी ठरला होता –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली होती. पहिल्या डावात तो दोन चौकारांच्या मदतीने १४ धावा काढून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने सात चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. मात्र, चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना कोहलीकडून मोठ्या आणि सामना जिंकवणाऱ्या खेळीची अपेक्षा होती, त्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.
विराट कोहलीची यंदाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी –
यावर्षी कोहलीने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ८ डावात फलंदाजी करताना त्याने ४५ च्या सरासरीने ३६० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १८६ धावांची शतकी खेळी निघाली आहे. विशेष म्हणजे, कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळले आहेत, चार बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि एक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.