Virat Kohli Exercise : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका सुरू केली आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते विराट कोहली सध्या प्रचंड दबावाखाली खेळत आहे. एकूणच विराट कोहली नकारात्मक स्थितीमध्ये असल्याचे चित्र आहे. असे असूनही त्याने आपल्या शारिरिक तंदुरुस्तीवर याचा तसूभरही परिणाम होऊ दिलेला नाही. त्याचा नवीन इन्स्टाग्राम व्हिडीओ बघितल्यानंतर याची प्रचिती येते.

भारतीय संघातील फिट खेळाडूंचा विचार केला तर विराट कोहलीचे नाव कायम अग्रस्थानी येते. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. विराटने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हे बऱ्याच काळापासून प्रलंबित होतं. पण, मला वाटतं अजूनही उशीर झालेला नाही’, अशा कॅप्शनसह त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो डान्सच्या माध्यमातून व्यायाम करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

विराट कोहली इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याने व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला. व्हिडीओ शेअर करून विराट कोहलीने दाखवून दिले आहे की, तो क्रिकेट खेळत असो वा नसो, फिटनेसबाबत कधीही तडजोड करत नाही.

हेही वाचा – भारतीय खेळाडूंनी द्रविड गुरूजींना आपल्या तालावर नाचवलं! Video झाला व्हायरल

दरम्यान, २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या काळात तो पत्नी आणि मुलीसह लंडनमध्ये राहणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे.

Story img Loader