यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत ४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरोधील सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने अनेक खुलासे केले. सोबतच त्याने भावनिक होत टेस्ट क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर मला फक्त महेंद्रसिंह धोनीचा मेसेज आला, अशी माहिती दिली. दरम्यान, कोहलीने केलेल्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगात अनेक प्रतिक्रया व्यक्त केल्या गेल्या. असे असताना कोहलीने इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा >>> भारत विरुद्ध श्रीलंका : टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती; सर्वोत्कृष्ट Playing 11 साठी आहेत ‘हे’ तीन पर्याय

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने कोणत्या लोकांना हृदयात स्थान दिले जावे, याबाबत मत व्यक्त केलेआहे. “जे लोक तुमच्या आनंदात आनंदी आणि तुमच्या दु:खात दु:खी असतात त्यांना ओळखा. हे लोक तुमच्या हृदयात विशेष स्थान मिळण्याच्या लीयकीचे असतात, ” असे विराट कोहली आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाला आहे.

हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

दरम्यान, विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्याविषयी होते, असे म्हटले जात आहे. मला २० मिनिटं कोहलीला मार्गदर्शन करता आलं, तर फलंदाजीत कोणते बदल करावेत हे मी त्याला सांगू शकेन, असं गावस्कर एका मुलाखतीत म्हणाले होते.

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

विराटच्या या वक्तव्यावर रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला ज्या खेळाडूकडून संपर्क अपेक्षित होता, त्याचं नाव त्याने सांगावं आणि तो कोणत्या संदेशाची वाट पाहत होता हे देखील स्पष्ट करावे. विराट नक्की कोणत्या माजी सहकाऱ्यांबद्दल बोलत आहे, हे सांगणं अवघड आहे,” असे रवी शास्त्री म्हणाले होते.