Virat Kohli should not be made captain of RCB says Sanjay Manjrekar : आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटी रुपये खर्चून कायम ठेवले आहे. फ्रँचायझीने विराटवर एवढा पैसा खर्च केल्यानंतर आगामी हंगामात ‘किंग कोहली’ पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराटला कर्णधार करण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आरसीबीने कोहलीला पुन्हा कर्णधार बनवू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. कोहलीची प्रतिष्ठा पाहण्याऐवजी कोहलीने गेल्या काही हंगामात बॅटने कशी कामगिरी केलीय? यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे माजी खेळाडूने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय मांजरेकर काय म्हणाले?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, संजय मांजरेकर म्हणाले की, कर्णधारपदाच्या ओझ्याचा विराटच्या कामगिरीवर परिणाम होतो. माजी खेळाडू म्हणाले, “एकदा विराट कोहलीची प्रतिष्ठा तुमच्या मनातून काढून टाका आणि फक्त त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याच्या विक्रमांची तुलना करा. मग तुम्हाला समजेल की विराटने कर्णधार व्हावे की नाही. गेल्या वर्षी त्याने १५० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि पूर्वी त्याचा स्ट्राइक रेट १३० पेक्षा कमी होता.”

विराट कोहलीला कर्णधार करु नये –

टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही, असे संजय मांजरेकरांचे मत आहे. ते म्हणाले, “विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडू शकतो का? ९५ टक्के चाहत्यांना विराटला कर्णधार म्हणून पाहायचे आहे. तुम्ही कर्णधार असताना त्याची आकडेवारी पाहा, त्याची खास कामगिरी फारशी खास राहिलेली नाही. ही माझी समस्या आहे. कारण मला भावनिक व्हायला आवडत नाही. चाहत्यांप्रमाणे नायकाची पूजा करून मला सत्यापासून दूर जायचे नाही. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये नाही, पण भारताला त्याची गरज आहे. तसेच तो टी-२० क्रिकेटमध्ये तो ७-८ वर्षांपूर्वी जितका महान खेळाडू होता, तितका आता राहिलेला नाही, असे मला वाटते.”

हेही वाचा – IND vs NZ : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटी का खेळत नाहीये? कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण

विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द –

विराट कोहलीने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द आरसीबीला समर्पित केली आहे. या संघाकडून आतापर्यंत २५२ सामने खेळताना त्याने ८,००४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३८.६७ राहिली आहे. या काळात त्याने ८ शतके आणि ५५ अर्धशतकेही झळकावली आहेत. विराटला आरसीबीने आयपीएल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli should not lead rcb in ipl 2025 sanjay manjrekar opposes after ipl 2025 retention list announced vbm