नवी दिल्ली : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून विराट कोहलीला सलामीला बढती दिली पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने व्यक्त केले. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा या आठवडयाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. या संघात सलामीसाठी रोहित, कोहली आणि यशस्वी जैस्वाल असे तीन पर्याय आहेत. रोहित गेल्या दशकभराहूनही अधिक काळापासून भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावत आहे. मात्र, आता त्याच्याऐवजी कोहलीने सलामीला येणे अधिक योग्य ठरेल असे जडेजाला वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘माझ्या मते, कोहलीने सलामीला आले पाहिजे आणि रोहितने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. रोहित या संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यात बरेच विचार सुरू असतील. अशात तिसऱ्या क्रमांकावर खेळणे त्याला अधिक फायदेशीर ठरू शकेल. त्याला खेळ कोणत्या दिशेला चालला आहे हे समजू शकेल आणि त्यानुसार तो फलंदाजीची शैली निश्चित करू शकेल,’’ असे जडेजा म्हणाला.

‘‘कोहलीबाबत एक गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे, ती म्हणजे तो कामगिरीत सातत्य राखतोच. त्याचा योग्य उपयोग करून घेणे गरजेचे आहे. सलामीला आल्यास त्याला ‘पॉवर-प्ले’मध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे खेळपट्टीवर स्थिरावरण्यास त्याला मदत होते. तो एका बाजूने चांगली कामगिरी करत असल्यास अन्य फलंदाजांचे कामही सोपे होते,’’ असेही जडेजाने नमूद केले.

हेही वाचा >>> IPL 2024 : कामगिरी उंचावण्याचे गुजरातचे लक्ष्य; रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी आज गाठ; गिल, कोहलीकडून अपेक्षा

तसेच जडेजाने लय मिळवण्यासाठी झगडत असलेल्या अष्टपैलू हार्दिक पंडयाच्या निवडीचेही समर्थन केले. ‘‘हार्दिक खूप खास खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू आपल्या देशात सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे विश्वचषकासाठी त्याची निवड होणार हे निश्चितच होते. त्याचा अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकेल. कर्णधार म्हणून रोहित त्याला कशाप्रकारे वापरतो यावरही हार्दिकचे यश अवलंबून असेल,’’ असे जडेजा म्हणाला.

कोहली-हार्दिकची कामगिरी महत्त्वाची -श्रीसंत

ट्वेन्टी-२० विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना भारतासाठी विराट कोहली आणि हार्दिक पंडया यांची कामगिरी सर्वात महत्त्वाची ठरू शकेल, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला वाटते. ‘‘कोहली आणि हार्दिक ही जोडी धावांचा पाठलाग करताना भारताला सामने जिंकवून देऊ शकेल,’’ असे श्रीसंत म्हणाला. ‘‘हार्दिकला यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये फारसे यश मिळालेले नाही. मात्र, यापूर्वी त्याने फलंदाज आणि गोलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केलेले आहे. त्याने एका मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि आपण जिंकलो होतो. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकत नाहीत,’’ असेही श्रीसंतने सांगितले.