नव्याने जाहीर झालेल्या रिलायन्स आंतराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीची दोन स्थानांनी घसरण झाली असून कोहलीला आता दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे.
विराट कोहलीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा तडफदार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आठवे स्थान प्राप्त केले आहे. केप टाऊनमध्ये सुरू असलेल्या दोन्ही सामन्यांत डेव्हिड वॉर्नरने एकात १३५ आणि दुसऱया सामन्यात १४५ अशी शतकी खेळी केली. याखेळीमुळे डेव्हिडची आंतराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती झाली आहे.
क्रमवारित एबी.डिव्हिलिअर्सचे अव्वल स्थान कायम असून कुमार संगकारा दुसऱया स्थानावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये विराट कोहलीला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला स्थान मिळविता आलेले नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा