ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या विभागात अग्रस्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने पुण्यात ६१, जयपूरला नाबाद १००, मोहालीत ६८, नागपूरमध्ये नाबाद ११५ आणि बंगळुरूला ० धावा काढल्या. २४ वर्षीय कोलीने ११४.६६च्या सरासरीने धावा काढून ३८ गुण मिळवत क्रमवारीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. कोहलीने प्रथमच ही मजल मारली आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर कोहली हा जागतिक फलंदाजीच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला.
फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अग्रस्थानावर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील
First published on: 04-11-2013 at 02:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli stands top in batting ranking