IND vs AFG, World Cup 2023: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषकातील नववा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, लोकल बॉय विराट कोहलीने आपल्या डान्सने दिल्लीच्या चाहत्यांची मने जिंकली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणारा कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांबरोबर मजामस्ती करताना दिसला. कोहलीच्या डान्सने प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तत्पूर्वी, खेळ सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांनी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक येताच ‘कोहली..कोहली’ असा जयघोष केला. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल २०२३दरम्यान कोहली आणि नवीन यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. तसेच, या सामन्यात गौतम गंभीर देखील समालोचन करत आहे. त्यामुळे यावर सोशल मीडियात बरीच चर्चा सुरु आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर तीन विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या धावसंख्येला रोखण्यात टीम इंडियाला यश आले आहे. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्याने अफगाणिस्तानची सकारात्मक सुरुवात झाल्यानंतर थोडीशी पडझड झाली. अफगाणिस्तानला सामन्यात परत आणण्याच्या उद्देशाने हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई क्रीजवर आहेत. तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तानने भारतासमोर ठेवले २७३ धावांचे आव्हान
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून २७२ धावा केल्या. भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावा केल्या. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या इतर अनेक फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. २२ धावा करणारा इब्राहिम झद्रान संघाचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांचे प्लेइंग-११
अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.