Virat Kohli on Wife Anushka Sharma After Century: किंग कोहलीचे कसोटी शतक… विराट कोहलीने ऑस्ट्रेलियातील आपाल रेकॉर्ड कायम ठेवत कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीने मोठ्या कालावधीनंतर फॉर्ममध्ये परतला आणि शानदार शतक झळकावत त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १४३ चेंडू खेळून शतक झळकावले, यादरम्यान त्याने आपल्या बॅटने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. या शतकानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माबाबत त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

विराट कोहलीने ४९१ दिवसांनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. विराटने यापूर्वी २० जुलै २०२३ रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अखेरचे कसोटी शतक झळकावले होते, आता पर्थमध्ये त्याने शतक झळकावत पुनरागमनाचा डंका वाजवला आहे. तिसऱ्या दिवशी पडिक्कलची विकेट पडल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. विराटने सावध खेळी करत टीब्रेकपर्यंत ४० धावा केल्या. यानंतर विराट कोहलीने स्वत:ला दोनदा बाद होण्यापासून वाचवले. दोन्ही वेळा चेंडू त्याच्या विकेटला लागण्यापासून वाचला. नशिबाने साथ दिल्याने विराट कोहलीने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने ९४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर तुफानी शैलीत खेळत त्याने आपले शतक झळकावले.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना, एअरपोर्टवर पत्नी रितिकाने ‘असा’ दिला भावनिक निरोप; VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा – IND vs AUS: २२ वर्षांच्या यशस्वी जैस्वालने शतकासह विक्रमांची लावली रांग, सचिन तेंडुलकरच्या महाविक्रमाची साधली बरोबरी; तर…

पर्थ कसोटी सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही स्टॅन्डसमध्ये उपस्थिती लावली होती. विराट कोहलीचे कमबॅक शतक अनुष्काने आनंदी होत उभी राहत साजरं केलं. अनुष्का शर्माबाबत विराट कोहली म्हणाला, “प्रत्येक चांगल्या-वाईट काळात अनुष्का कायम माझ्याबरोबर आहे. पडद्यामागे चाललेलं सर्व काही तिला माहित आहे. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल तेव्हा तुमच्या मनात काय चालू असतं याचाही तिला अंदाज आहे. मी संघावर बोजा म्हणून खेळत राहणारा असा खेळाडू नाही. देशासाठी कामगिरी केल्याचा मला अभिमान आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: राहुल-जैस्वालच्या जोडीने घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात आजवर कोणत्याच भारतीय फलंदाजांनी केली नव्हती अशी कामगिरी

विराट कोहलीने दिग्गज सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

पर्थ कसोटीत शतक झळकावताच विराट कोहलीने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. किंग कोहली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वात कमी डावात ९ शतकं करणारा खेळाडू ठरला आहे. सचिनने ६५ डावात ९ शतकं झळकावली होती. विराट कोहलीने सचिनला आणखी एका बाबतीत मागे टाकले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक ७ कसोटी शतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ६ शतकं झळकावली होती. गावसकर यांनी हा पराक्रम ५ वेळा केला होता.