विश्वचषकात समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फलंदाज विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आह़े मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने सहाव्या स्थानी झेप घेतली. कोहली व धवनसह भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आठव्या क्रमांकासह अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले आहे.
सात स्थानांची भरारी घेत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पाकिस्तानच्या मिसबाह उल हक आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ यांच्यासह संयुक्तपणे बाराव्या स्थानावर विराजमान झाला आहे. फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डी’व्हिलियर्स पहिल्या स्थानावर असून श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि आफ्रिकेचा हाशिम आमला अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत़ ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान कायम राखले असून त्यांचा गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे.
विराट चौथ्या स्थानावर कायम
विश्वचषकात समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फलंदाज विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आह़े
![विराट चौथ्या स्थानावर कायम](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/09/M_Id_365185_Virat_Kohli1.jpg?w=1024)
First published on: 01-04-2015 at 12:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli steady at fourth