विश्वचषकात समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फलंदाज विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आह़े मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने सहाव्या स्थानी झेप घेतली. कोहली व धवनसह भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आठव्या क्रमांकासह अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले आहे.
सात स्थानांची भरारी घेत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पाकिस्तानच्या मिसबाह उल हक आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ यांच्यासह संयुक्तपणे बाराव्या स्थानावर विराजमान झाला आहे. फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डी’व्हिलियर्स पहिल्या स्थानावर असून श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि आफ्रिकेचा हाशिम आमला अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत़ ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान कायम राखले असून त्यांचा गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा