Suryakumar Yadav Flashback 2022: टी २० विश्वचषकासह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये २०२२ हे वर्ष खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवचे वर्ष ठरले होते. टीम इंडियाच्या अनेक पराक्रमी सामन्यांमध्ये सूर्याची बॅट तळपली होती. २०२२ च्या सरतेशेवटी आता सूर्यकुमारने स्वतः आपल्या काही आवडत्या सामन्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच एका सामन्याच्या आधी विराट कोहलीसह घडलेला एक किस्सा सुद्धा सूर्याने शेअर केला आहे. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सूर्याने सांगितले की, २०२२ मध्ये असे काही शॉट्स होते जे खेळल्यावर मला स्वतःला मी हे कसं केलं यावर विश्वास बसत नव्हता. केवळ धावाच नव्हे तर सर्वांगीण आपली बेस्ट इनिंग कोणती होती हे ही सूर्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट माझ्याकडे आला आणि..

सूर्याने विराट कोहलीसह एका आठवणीचा खास उल्लेख करत सांगितले की, मी रोहित शर्माला ओळखत होतो. काही सामने एकत्र खेळल्यावर शर्माने मला सांगितले की, मी आता तुझ्या खेळाविषयी काही बोलूच शकत नाही. यानंतर मी एकदा विराट कोहली भाईसह खेळात होतो. तेव्हा माझा खेळ पाहून विराट माझ्याकडे येऊन म्हणाला की, “तू काय व्हिडीओ गेम्स खेळतोय का?” मला हे कौतुक ऐकून मस्त वाटलं होतं.

राहुल द्रविडचा विश्वास होता की..

मी राहुल (द्रविड) भाईशीही बोललो. जेव्हा त्याने माझी अशी खेळी पाहिली तेव्हा तो आला आणि मला म्हणाला की मी ज्या स्थितीत फलंदाजी करतो, मी खेळ बदलू शकतो. जेव्हा ते भारताचे प्रशिक्षक बनले तेव्हा मी त्यांनासांगितले की जेव्हा सामना ७- १४ षटकांच्या दरम्यान असेल तेव्हा कृपया मला फलंदाजीसाठी पाठवा. अशा परिस्थितीत मी मुंबई इंडियन्ससाठी अनेकदा फलंदाजी केली आहे. त्या विशिष्ट परिस्थितीत धावा कशा करायच्या हे मला माहीत आहे. माझी इच्छा होती आणि मी जेव्हा सांगितलं तेव्हा मला संधी मिळाली म्हणूनच मी असं खेळू शकलो.

हे ही वाचा<< IND vs SA: टीम इंडियाचा तळपता सूर्या! सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित, म्हणाला, “मी रबरी बॉल..”

दरम्यान, सूर्यकुमार यादवने सांगितले की, जे शॉट्स आपण देशांतर्गत सामन्यांमध्ये किंवा आयपीएलमध्ये सहज खेळू शकतो तेच शॉट्स आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जसे की विश्वचषकात खेळणे अत्यंत कठीण असते. पण जेव्हा मला हे शॉट्स २०२२ च्या विश्वचषकात खेळता आले तेव्हा मी स्वतः थक्क झालो होतो. सोशल मीडियावर मी मागच्या तीन महिन्यातील स्वतःचेच शॉट्स जेव्हा पाहिले तेव्हा मला प्रश्न पडला की मी हे कसे खेळू शकलो? मी हे कसं केलं?

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli stopped innings asked surykumar yadav are you playing video game sky recalls best cricket matches in 2022 svs