Virat Kohli Latest News: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्यांच्या धडाकेबाज क्रिकेट पप्रमाणेच जबरदस्त फिटनेससाठी सुद्धा ओळखला जातो. विराट आपल्या व्यायामासह खाण्या- पिण्याकडे सुद्धा पूर्ण लक्ष देऊन असतो. आजवर अनेकदा आपण विराटच्या ७०० रुपये लिटर पाण्याच्या चर्चा ऐकल्या असतीलच. पण तुम्हाला माहितेय का, याच अतिदक्ष विराटने आपल्या एका दौऱ्याच्या वेळी फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेफकडे आपल्याला शिळे अन्नच खायचे आहे असा हट्ट धरला होता. या शेफने अलीकडेच हा किस्सा स्वतः सांगितला आहे

तिरुवनंतपूरमच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफ पिल्ले यांनी सांगितल्यानुसार, २०१८ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एक दिवसीय सामने खेळवले जाणार होते. या सामन्यासाठी तिरुवनंतपूरमला पोहोचलेली टीम इंडिया ही रावीज कोवलम या हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी टीमसाठी हॉटेलने छान सीफूड ची मेजवानी आयोजित केली होती. मात्र तेव्हा विराट कोहली शाकाहारी असल्याने त्याने या मेजवानीचा भाग होण्यास नकार दिला. तेव्हा विराटसाठी हॉटेलच्या शेफने खास ‘साद्या’ (ज्यामध्ये केरळच्या पारंपरिक शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो) तयार केला होता. तब्बल २४ पदार्थांचा साद्या कोहलीसाठी तयार केला होता.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Jasprit Bumrah Reacts to bed Rest fake news says I know fake news is easy to spread but this made me laugh
Jasprit Bumrah : ‘मला माहित आहे की…’, बेड रेस्टच्या फेक न्यूजवर जसप्रीत बुमराहने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या बातमीने मला…’
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Vinod Kambli struggles to walk but touches Sunil Gavaskar feet at Wankhede Stadium ceremony video viral
Wankhede Stadium : विनोद कांबळीने जिंकली सर्वांची मनं! सुनील गावस्कर दिसताच केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

अर्थात केवळ एका व्यक्तीच्या प्रमाणात एवढे पदार्थ बनवणे कठीण असल्याने काही पदार्थ अधिक बनले गेले. जेव्हा हॉटेलच्या शेफने हे पदार्थ कोहलीला वाढले तेव्हाच त्याने बाकीच्या उरलेल्या जेवणाचं काय होणार असा प्रश्न केला, तेव्हा शेफने हे जेवण फेकून दिले जाईल कारण हॉटेलमधील पाहुण्यांना किंवा कर्मचाऱ्यांना शिळे जेवण दिले जात नाही असे सांगितले. यावर कोहलीने उत्तर दिले की मी हेच जेवण रात्री सुद्धा खाईन. BCCI च्या कठोर नियमानुसार कुठल्याच खेळाडूला शिळे अन्न देण्याची परवानगी नव्हती पण कोहलीने खूपच हट्ट केल्यावर शेवटी त्याची इच्छा पूर्ण करावी लागली.

हे ही वाचा<< अर्जुन तेंडुलकरचा मैदानातील किळसवाणा Video व्हायरल; फॅनने ‘ही’ नवी क्लिप दाखवत दिलं सडेतोड उत्तर

दरम्यान, हा किस्सा ऐकल्यावर विराटच्या या हट्टाचे कारण ऐकून त्याचे चाहते सुद्धा खूप कौतुक करत आहेत. ७०० रुपये लिटरचे पाणी पिणे हा त्याचा निर्णय आहे पण म्हणून तो अन्नाचा किंवा पैशाचा अपमान करत नाही हे ही खरंय अशा प्रतिक्रिया विराटाचे चाहते देत आहेत. तुम्हाला किंग कोहलीचा हा स्वभाव कसा वाटला? कमेंट करून कळवा.

Story img Loader