विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 156 धावांचं आव्हान भारताने शिखर धवन आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. या सामन्यात विराट कोहलीचं अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकलं, मात्र या खेळीदरम्यान विराटने वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : गांगुली-धोनीला मागे टाकत ‘गब्बर’ने पटकावलं मानाचं स्थान

16 व्या षटकात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत विराट कोहलीने या विक्रमाला गवसणी घातली आहे. ब्रायन लाराने आपल्या कारकिर्दीत 299 वन-डे सामन्यांमध्ये 40.48 च्या सरासरीने 10 हजार 405 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 59.68 च्या सरासरीने 220 व्या वन-डे सामन्यात लाराला मागे टाकलं आहे. अशी कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनीनंतरचा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. सध्या मालिकेत भारताने आघाडी घेतलेली असून दुसरा सामना 26 जानेवारीला होणार आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : नेपियरच्या मैदानात शमीच्या बळींचं शतक, केली अनोख्या विक्रमाची नोंद

Story img Loader