IND vs SA Virat Kohli Gesture Video: रविवारी, विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडेमध्ये सर्वाधिक शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करत कोहलीने ४९ वे शतक पूर्ण केले. कोहलीच्या शतकामुळे भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन मध्ये ३२६/५ अशी धावसंख्या उभारली आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ ८३ धावांवर गुंडाळले. २४३ धावांनी विजय मिळवून भारताने आपले गुणतालिकेतील टॉपचे स्थान टिकवून ठेवले आहे. भारताचा हा सलग आठवा विजय होता आणि याचा विक्रमी विजयानंतर विराट कोहलीने ईडन गार्डन्सवर ग्राउंड स्टाफसाठी केलेली एक कृती सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कालच्या सामन्यात विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यावेळी ३५ वर्षीय ‘बर्थडे बॉय’ ने सांगितले की, “मी त्याच्या (तेंडुलकर) इतका चांगला कधीच असू शकत नाही पण माझ्या बालपणीच्या हिरोचा रेकॉर्ड गाठणे हा सुद्धा माझ्यासाठी सन्मान आहे मी त्याला टीव्हीवर बघायचो आणि मला माहित आहे मी कशातून पुढे आलो आहे. आजच्या रेकॉर्डनंतर तेंडुलकरने केलेले ट्वीट तर माझ्यासाठी अत्यंत खास आहे. “

सचिन तेंडुलकरने केलेल्या कौतुकाने भारावून गेलेल्या विराट कोहलीने सामन्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. कोहली म्हणाला की, “आज आम्ही स्पर्धेतील सर्वात तगड्या संघाच्या विरुद्ध खेळत होतो. पण चांगलं खेळायचं याच एका उद्देशाने संघ खेळत होता. आज माझा वाढदिवस इथल्या लोकांनी खूप खास केला आहे. मी काहीतरी आहे याची जाणीव करून देणारा आजचा दिवस होता” असं म्हटल्यावर कोहलीने मैदानावर उपस्थित ग्राउंड स्टाफची भेट घेऊन त्यांच्यासह फोटो काढला. याच क्षणाचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला भारताच्या आधी स्पर्धेतील एकमेव पराभव नेदरलँड्सच्या विरुद्ध पत्करावा लागला होता त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा उपांत्य फेरीतील स्थान निश्चित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli sweet gesture for eden gardens ground staff after 49th century ind vs sa match highlights king kohli birthday video svs