Virat Kohli Taking Selfie Video With Fans: सध्या भारतीय संघातील अनेक खेळाडू आशिया कप २०२३ च्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, टीमचा सुपरस्टार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओत विराट कोहली विमानतळावर चाहत्यांसोबत काही सेल्फी घेताना दिसत. विराट कोहली मैदानाबाहेर त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. तो अनेकदा चाहत्यांना सेल्फी आणि ऑटोग्राफ देताना दिसतो. किंग कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विराट कोहली विमानतळावर कारमधून खाली उतरतो, तेव्हाच एक चाहता खास टी-शर्ट धरून विराट कोहलीच्या दिशेने चालत जात असल्याचे दिसून येते. विराट फॅनकडे बघतो आणि थांबतो आणि सेल्फी घेतो. चाहत्याच्या हातात विराट कोहलीच्या फोटोंनी भरलेला टी-शर्ट आहे. यानंतर किंग कोहली दुसऱ्या चाहत्यांसोबतही सेल्फी घेतो. अशा प्रकारे, विमानतळाच्या आत जाताना तो चाहत्यांना खूश करताना दिसला.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास

आशिया कपमधून किंग कोहली मैदानात परतणार –

विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळताना दिसला होता. कसोटीत त्याच्या बॅटमधून एक शतक पाहायला मिळाले. एकदिवसीय मालिकेत तो फक्त एकच सामना खेळला, ज्यामध्ये तो फलंदाजीसाठी आला नाही आणि उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. दुसरीकडे, दुसऱ्या कसोटीच्या माध्यमातून किंग कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, ज्यामध्ये त्याने १२१ धावांची सुरेख खेळी साकारली. ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा जगातील कोहली पहिला फलंदाज ठरला.

हेही वाचा – महेंद्रसिंग धोनीने Chandrayaan-3 च्या लँडिंगचे केले खास सेलिब्रेशन, VIDEO होतोय व्हायरल

आता कोहली थेट आशिया कपच्या माध्यमातून मैदानात परतणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ मध्ये भारतीय संघ २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. आशिया कप पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या भूमीवर खेळवला जाईल. टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

आशिया चषकसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा.