IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकं टाकण्यात आली. सततच्या पावसामुळे दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. सध्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून बुमराहने भारताला झटपट २ विकेट्स मिळवून दिले आहेत. लबुशेन आणि स्मिथची जोडी सध्या मैदानात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू सराव करत होते. यादरम्यानचा हरभजन सिंग आणि विराट कोहलीचा डान्स करतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. विराट कोहली हरभजन सिंगशी बोलत असल्याचा आणि त्याला डान्स करायला पटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण मैदानात विराट, हरभजनशी नेमकं काय बोलत होता हे हरभजनने नंतर सांगितलं. खरंतर विराट त्याच्या ड्रेसिंगवरून त्याची मजा घेत होता.
हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?
अनुभवी फिरकीपटूने नंतर खुलासा केला की कोहली त्याच्या ड्रेसिंगवरून मजा घेत होता. हरभजनची या व्हीडिओमधील ड्रेसिंग पांढरा रंग आणि गुलाबी रंगाचा शर्ट त्यात होता. हरभजनचा हा लूक हिम्मतवाला चित्रपटातील बॉलीवूड अभिनेता जितेंद्रच्या आयकॉनिक लुकशी मेळ साधणारा आहे. कोहलीने लगेचच हे साम्य ओळखले आणि हरभजनची मजा घेण्यास सुरुवात केली.
विराटने वेळ न दडवता लांबूनच त्याला काही डान्स स्टेप्स करून दाखवल्या आणि न राहवता विराट पुढे येऊन हरभजनची आणखी मजा घेण्यासाठी नैनो में सपना या गाण्यातील आयकॉनिक स्टेप्स सादर केल्या. एकत्र क्रिकेट खेळलेले विराट आणि हरभजन सिंग अनेकदा मजा मस्ती करताना दिसतात.
हरभजनने नंतर स्टार स्पोर्ट्सवर नेमका प्रसंग सांगितला, “आज मी हलका गुलाबी आणि पांढरा रंग असलेला जॅकेट घातलं होतं, पण ते दुरून पूर्ण पांढऱ्या रंगाचं दिसत होतं. तेव्हा विराट कोहली म्हणाला, ‘(ऐथे जितेंद्र आ गया आ)’ जितेंद्र इथे आला आहे का?. त्याने मग नैनो में सपना गाण गुणगुणायला सुरुवात केली. मग डान्स मूव्ह दाखवायला सुरुवात केली, जी मला सुरुवातीला समजली नाही. तो स्वत:ला थांबवू शकला नाही आणि पूर्ण डान्स स्टेप्स दाखवण्यासाठी माझ्या जवळ आला. डी ड्रेसिंग करून मी चूक केली असे मला वाटू लागलं. जर मी ते पांढऱ्या चामड्याचे बूट देखील घातले असते तर मी पूर्णपणे जीतू जी सारखा दिसलो असतो!” विराट कोहली हरभजनला एकदा नैनों मैं सपना गाण्यावरील प्रसिद्ध डान्स स्टेप्स करण्यासाठीही मनवताना दिसला पण हरभजनने काही शेवटपर्यंत ऐकलं नाही.
हेही वाचा – D Gukesh: गुकेशच्या विश्वविजेतेपदाने रशियाला पोटशूळ; डिंग लिरेनवर केला मुद्दाम हरल्याचा आरोप