IND vs NZ Virat Kohli 50th Century Moment Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात ५० वे शतक पूर्ण केले आहे.विराट कोहलीने आजच्या सामन्यातील मोठ्या धावसंख्येविषयी बोलताना अनेकांना या इनिंगचे श्रेय दिले. तो म्हणाला की, “सगळं जुळून आल्याने आज इतकी मोठी धावसंख्या उभारता आली. संपूर्ण संघाने केलेल्या एकत्रित मेहनतीला याचं श्रेय जातं. रोहितने सुरुवातच दणक्यात करून दिली होती त्यानंतर गिलने पण चांगली लय पकडली होती. श्रेयसचं शतक, के. एल, राहुलने जबरदस्त पद्धतीने फिनिश केलेली इंनिंग सगळं काही परफेक्ट होतं. त्यामुळेच आज आम्ही जवळपास ४०० चा टप्पा गाठू शकलो.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीला त्याच्या ५० व्या शतकानंतर कसं वाटतंय विचारलं असता कोहली म्हणाला की, “माझ्यासाठी टीम जिंकणं आवश्यक आहे मग मी त्यासाठी वाटेल ते करेन, मला यंदा विश्वचषकात टीमकडून ज्या पद्धतीने खेळण्याचे आदेश मिळाले आहेत मी त्याच पद्धतीने खेळतोय. टीमला सध्या मी डीप खेळावं असं वाटतंय मग मी तसंच खेळणार. मी पीचवर टिकून राहून इतरांना खेळायची संधी द्यायचा प्रयत्न करतोय.मी आता इतरांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतोय कारण शेवटी संघ जिंकणे महत्त्वाचे आहे.”

Video: विराट कोहली ५० वे शतक पूर्ण करतानाचा क्षण

हे ही वाचा<< विराट कोहलीची ५० व्या शतकानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आज मैदानात अनुष्का होती आणि मला..”

दरम्यान, आजच्या भारत विरुद्ध न्यझीलंड सामन्यातील कोहलीचे शतक दरम्यान. आजच्या सामन्यातील विराटचं शतक हे त्याच्या खात्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर २०- २० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. कोहली व श्रेयस अय्यरचे शतक, गिलची ८० धावांची खेळी याच्या बळावर भारताने ३९८ धावांचे लक्ष्य दिले आहे. सध्या न्यूझीलंडचा स्कोअर ८ षटकात ४० ला दोन बाद असा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli tells team india plan behind 50th century says i will do whatever team told me to give others confidence ind vs nz highlight svs