दुखापतग्रस्त असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला झिम्बाब्वे दौऱयासाठी विश्रांती देण्यात आलीये. त्याच्याऐवजी विराट कोहली यांच्याकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱयासाठी टीम इंडियाच्या संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. 
मुरली विजय याला संघातून वगळण्यात आले आहे. गोलंदाज आर. अश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि भुनवेश्वरकुमार यांना या दौऱयासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी परवेझ रसूल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, मोहित शर्मा, जयदेव उनाडकट यांचा १५ जणांच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
येत्या २४ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱयावर जाणार आहे.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायडू, अजिंक्य राहाणे, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, मोहम्मद सामी, आर. विनयकुमार, मोहित शर्मा, जयदेव उनाडकट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा