Virat Kohli to Play Ranji Trophy After 12 Years: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते, पण त्यानंतर त्याचा फॉर्म मात्र सातत्याने खालावला. इतकंच नव्हे तर विराट सातत्याने बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू खेळताना स्लिपमध्ये झेलबाद झाला आणि सातत्याने तो तीच चूक करत होता. यामुळे त्याला खूपच ट्रोल करण्यात आलं. हे पाहून अनेकांनी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. यानंतर आता विराट कोहलीने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीची भारतीय संघात निवड करण्यात आली. ३० जानेवारीपासून दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी त्याने स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. हा सामना फक्त दिल्लीच्या मैदानावर खेळवला जाईल, जे संघाचे होम ग्राउंड देखील आहे. त्याने २०१२ मध्ये दिल्लीकडून उत्तर प्रदेश विरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळला होता.

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Named In Mumbai Squad for Ranji Trophy Game Against Jammu Kashmir
Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघाची घोषणा, रोहित शर्मा १० वर्षांनी खेळणार; कोण करणार संघाचं नेतृत्त्व?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Aditi Tatkare
“अर्जांची पडताळणी करून अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार”, आदिती तटकरेंचं वक्तव्य; कशी होणार कारवाई?
IPL 2025 Retention CSK Announce Retained Players With Riddle of 5 Names see Cryptic Social Media Post
IPL 2025 Retention: हेलिकॉप्टर, किवी…; CSKने दिली मोठी हिंट, जाहीर केली रिटेन खेळाडूंची यादी? पाहा कोण आहेत ‘हे’ ५ खेळाडू
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

हेही वाचा – Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघाची घोषणा, रोहित शर्मा १० वर्षांनी खेळणार; कोण करणार संघाचं नेतृत्त्व?

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मानेच्या दुखापतीमुळे कोहली २३ जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्यात खेळू शकणार नाही, परंतु त्याने डीडीसीएला सांगितले आहे की, तो रणजी ट्रॉफीमधील संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यासाठी उपलब्ध आहे. “विराटने डीडीसीएचे अध्यक्ष (रोहन जेटली) आणि संघ व्यवस्थापनाला कळवले आहे की तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे,” असे दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी पीटीआयला सांगितले.

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं?

ऑस्ट्रेलियातील मालिका गमावल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या करारबद्ध क्रिकेटपटूंना कोणत्याही फिटनेस समस्या नसल्यास देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीने दिल्लीसाठी रणजी ट्रॉफी सामना खेळलेला नाही. विराट कोहलीने २ डावात ४ आणि ४३ धावा केल्या होत्या. त्यावेळी दिल्लीचे नेतृत्व वीरेंद्र सेहवागकडे होते. त्या सामन्यात कोहलीबरोबर गौतम गंभीर, उन्मुक्त चंद, इशांत शर्मा आणि आशिष नेहरा खेळले होते.

हेही वाचा – Neeraj Chopra Wife: कोण आहे नीरज चोप्राची पत्नी? टेनिसपटू आणि आता आहे मॅनेजर; अमेरिकेत घेतेय शिक्षण

विराट कोहलीची गणना भारताच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण १५५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने आपल्या बॅटने ११,४७९ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३७ शतकं आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४ धावा आहे. दुसरीकडे, त्याने ३२९ लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १५३४८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ५४ शतकं झळकावली आहेत.

Story img Loader