श्रीलंका दौऱ्याच्या तयारीसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली भारत अ संघाकडून खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी गुरूवारी निवड समितीने कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची निवड केली. विराट कोहलीने बीसीसीआयच्या निवड समितीकडे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलिया अ संघा विरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार आहे, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्त्वाखाली सध्या भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्ध चार दिवसीय अनौपचारिक कसोटी सामने खेळत आहे. यातील दुसरा कसोटी सामना पुढच्या आठवड्यात होणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय अ संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाची ही पहिलीच ‘कसोटी’ आहे.
विराट कोहली भारत ‘अ’ संघाकडून खेळणार
श्रीलंका दौऱ्याच्या तयारीसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली भारत अ संघाकडून खेळणार आहे.
First published on: 23-07-2015 at 06:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli to play second unofficial test against australia a in chennai