India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Match Updates: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विश्वचषक २०२३ मध्ये विजयी मालिका सुरू ठेवली आणि सलग ९ वा विजय मिळवला. स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही टीम इंडियासाठी योगदान दिले. त्याचबरोबर विराट कोहलीने ९ वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये विकेट घेतली.

नेदरलँड्सच्या डावातील २३व्या षटकात कोहली गोलंदाजी करायला आला होता. विराटने त्याच्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात त्याने विरोधी संघाचा कर्णधार चार्ल्स एडवर्डसला झेलबाबाद केले. एडवर्डसचा यष्टीच्या मागे शानदार झेल घेतला .या विश्वचषकात कोहली दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना दिसला. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात त्याने फक्त तीन चेंडू टाकले आणि हार्दिकचे षटक पूर्ण केले होते.

या सामन्यात विराट कोहलीने आपला स्पेल पूर्ण केला. त्याने पहिल्याच षटकात सात धावा दिल्या, पण शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. स्लिप असती तर विराटला विकेट मिळाली असती. मात्र, पुढच्याच षटकात कोहलीने त्याची भरपाई केली आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेटही घेतली. त्याची वनडे कारकिर्दीतील ही पाचवी विकेट होती. या अगोदर विराट कोहलीने ९ वर्षापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध विकेट घेतली होती. त्याने ३१ जानेवारी २०१४ रोजी ब्रेंडन मॅक्युलमला बाद केले होते.

हेही वाचा – IND vs NED: सलग नववा विजय मिळवत भारताने रचला इतिहास! नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव करत चाहत्यांना दिली दिवाळीची भेट

बंगळुरूच्या चाहत्यांना कोहलीची गोलंदाजी खूप आवडली. कोहली गोलंदाजीला येताच संपूर्ण स्टेडियमध्ये आनंदाची लाट पसरली. यानंतर जेव्हा त्याने विकेट घेतली, तेव्हा सर्व चाहत्यांनी विराटच्या सेलिब्रेशनच्या आनंदा घेतला. कोहलीची गोलंदाजी भारतासाठी महत्त्वाची आहे, कारण उपांत्य आणि अंतिम सामन्यात कोणताही गोलंदाज जखमी झाल्यास टीम इंडिया अडचणीत येऊ शकते. कोहलीही नेटमध्ये खूप गोलंदाजी करताना दिसला आहे. विराट कोहलीपाठोपाठ शुबमन गिलनेही या सामन्यात गोलंदाजी केली.

स्कॉट एडवर्ड्सच्या आधी विराट कोहलीने कोणा-कोणाची घेतलीय विकेट?

रविवारी या स्पेलपूर्वी विराट कोहलीने गोलंदाजी करताना ६४४ चेंडू टाकले होते आणि ६७७ धावा दिल्या होत्या. यापूर्वी अॅलिस्टर कुक, क्रेग किस्वेटर, ब्रेंडन मॅक्युलम आणि क्विंटन डी कॉक यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्याने ३१ जानेवारी २०१४ रोजी वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथी विकेट घेतली होत्य. या सामन्यात त्याने ७ षटकात ३६ धावा देत १ विकेट्स घेतली होती. त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमला बाद केले होते.