Virat Kohli Touch Feet of Mohammed Shami Mother: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. संपूर्ण संघ एकमेकांसह आणि सर्वांच्या कुटुंबियांसह आपला आनंद साजरा करताना दिसले. दरम्यान विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याच्या आईला पाहताच त्याने चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा ४ विकेट्स राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. यानंतर शमीने त्याच्या आईची कोहलीसह भेट घडवून आणली. चेहऱ्यावर विजयाचा आनंद घेऊन कोहलीही शमीच्या आईजवळ पोहोचला आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यानंतर भारतीय स्टार फलंदाजाने शमीच्या कुटुंबियांसोबत फोटोही काढले.

बीसीसीआयने देखील सर्व खेळाडू आपल्या कुटुंबासह भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करत असलेला व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये शुबमन गिलचे बाबा लेकाला भेटल्यानंतर ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्याबरोबर भांगडा करताना दिसले. तर रवींद्र जडेजाचं कुटुंब सेल्फी काढताना दिसलं. विराट-अनुष्का रोहित-रितिका गप्पा मारताना दिसले. तर ड्रेसिंग रूममधील भारतीय संघ एकमेकांच्या जर्सीवर सही करतानाही दिसले. अखेरीस संघाने केक कापून सेलिब्रेट केले.

दुबईत ९ मार्चला झालेल्या अंतिम सामन्यात २५ वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंडचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले. भारताच्या नजरा २००० च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्यावर होत्या. प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने ५० षटकांत सात गडी गमावून २५१ धावा केल्या. शमीने ९ षटकांत ७४ धावा देत एक विकेट घेतली. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.

भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने वादळी फलंदाजी करत ७६ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ४८ आणि केएल राहुलने नाबाद ३४ धावा केल्या. कोहली अंतिम फेरीत काही खास करू शकला नाही. पण भारताच्या इतर फलंदाजांना संघाला विजय मिळवून दिला.