Virat Kohli flop show fans react : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात किंग कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ १ धाव काढून बाद झाला. पुण्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यांच्या भारताच्या पहिल्या डावात विराट कोहलीकडून खूप अपेक्षा ठेवल्या जात होत्या, पण तो एकदा धावा करण्यात अपयशी ठरल्याने चाहते सोशल मीडियावर व्यक्त होताना मीम्स शेअर करत आहेत.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी १ बाद १६ धावावरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल डाव पुढे नेण्यासाठी मैदानात उतरले होते. गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण ३० च्या वैयक्तिक स्कोअरवर मिचेल सँटनरने त्याला बाद केले. यानंतर त्याने विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत भारताला मोठा धक्का दिला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात जबरदस्त अर्धशतक झळकावल्यानंतर विराकडून खूप अपेक्षा होत्या. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने त्याला क्लीन बोल्ड केले. विराट मिचेलच्या फुलटॉस चेडूंवर आडवा शॉट मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला. विराट कोहली अशा प्रकारे बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण कोहली डावाच्या सुरुवातीला खूपच सावधपणे खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याला ९ चेंडूत फक्त एकच धाव करता आली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता चाहते विराट कोहलीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोरदार टीका होत आहे.
हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
u
विराट कोहलीच्या फ्लॉप शोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
एका चाहत्याने विराट कोहलीचे काही फोटो शेअर करताना लिहिले की, थोडा घाईत होतो, कारण लंडनला पण जायचं आहे ना!
त्याचबरोबर दुसऱ्या चाहत्याने विराट कोहलीच्या वारंवार इंग्लंडला जाण्यावर टीका केली आहे. त्याने लिहिले की, विराट कोहलीने आता इंग्लंडकडून खेळावे. तसा ही तो लंडनमध्ये स्थायिक झाला आहे आणि त्याला फिरकीपटूंविरुद्ध खेळता येईना झालंय.
तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, विराट कोहलीने यापुढे धावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याला फक्त लंडनला जाऊन सेटल व्हायचं आहे.
विराट कोहली आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत बाद होण्याचे प्रकार :
- डाव- १९८
- नाबाद-१२
- झेलबाद-१२६
- त्रिफळाचीत-१५
- पायचीत-४०
- धावबाद-३
- यष्टीचीत-१
- स्वयंचीत-१