Virat Kohli Viral Video Ahead of IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पर्थ कसोटीत शतक झळकावत आपल्या पुनरागमनाचा डंका वाजवला आहे. विराट कोहलीने बऱ्याच दिवसांनंतर कसोटी सामन्यात शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच कसोटीत विराट कोहली आपल्या लयीत असल्याचे पाहून भारतीय संघासह चाहतेही निर्धास्त झाले आहेत. यादरम्यान विराटचा एक वेगळाच व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या बॅगमधून कुऱ्हाड, तलवार काढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीचा एक व्हीडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला विचारण्यात आलं की तुझ्या बॅगमध्ये काय आहे? विराट कोहली बॅग उघडताच त्याच्यातून कुऱ्हाड काढतो, यानंतर काहीवेळाने बेसबॉलची बॅट येते, ज्याला वरच्या बाजूला तार गुंडाळलेली आहे. यानंतर विाट कोहली शेवटी दोन तलवार बाहेर काढतो आणि मग व्हीडिओ अचानक बंद पडतो. विराट कोहलीचा हा प्रमोशनल व्हीडिओ असून एखाद्या जाहिरातीचा व्हीडिओ असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांनी मात्र या व्हीडिओचं कनेक्शन सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी जोडलं आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “थोडं अजून मसालेदार केलं…”, विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना भन्नाट उत्तर; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

साहजिकच हा एखाद्या जाहिरातीशी संबंधित व्हिडिओ असू शकतो परंतु चाहते त्याला ॲडलेड कसोटीची तयारी असल्याचे म्हणत आहेत. ॲडलेड कसोटीत विराटकडे तलवारींऐवजी बॅट असेल आणि तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच शाळा घेईल, असे चाहते म्हणत आहेत.

हेही वाचा – SA vs SL Test: ४७ वर ऑल आऊट! श्रीलंकेची कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या, मार्को यान्सनची जादुई गोलंदाजी

ॲडलेड मैदानावरील विराटचा रेकॉर्ड

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा डे नाईट कसोटी असून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. ॲडलेड विराटचं ऑस्ट्रेलियातील आवडतं मैदान आहे, याचा प्रत्यय आकडेच देत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या मैदानावर विराटच्या बॅट चांगलीच तळपली आहे. विराटने या मैदानावर ४ पैकी ३ सामन्यात शतकं झळकावली आहेत, तर त्याच्या नावावर एक अर्धशतकही आहे. विराटने ॲडलेडमध्ये ८ डावात ६३.६२ च्या सरासरीने ५०९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी पराभवानंतर संघात केला मोठा बदल, ‘या’ अष्टपैलू खेळाडूला दिली संधी; दुसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर

ऑस्ट्रेलियासाठी हे आकडे नक्कीच धोक्याची घंटा असणार आहेत. याशिवाय फॉर्मात नसलेला विराट कोहली पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतकी कामगिरी करत पुनरागमन केलं आहे. विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावून टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli unveils axe swords from his bag video goes viral ahead of ind vs aus 2nd test bdg