भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली १०० आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करणार असल्याची मोठी भविष्यवाणी केली आहे. लिटिल मास्टरचे हे वक्तव्य कोहलीच्या ४६व्या एकदिवसीय शतकानंतर आले आहे. रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भारतीय खेळाडूने रविवारी श्रीलंकेविरुद्ध नाबाद १६६ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३वे शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. सचिनच्या नावावर १०० शतकांचा विक्रम आहे. सुनील गावसकर म्हणाले की कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके पूर्ण करू शकतो, परंतु यासाठी त्याला वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत खेळावे लागेल. सध्या, विराट कोहली यावेळी ३४ वर्षांचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “विराट ज्या फॉर्ममध्ये आहे, आता तो ज्या पद्धतीने खेळत आहे त्याच्यावरून तो आधीच तीन शतके पूर्ण करेन असे मला वाटते. आता टीम इंडियाकडे न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी तीन एकदिवसीय सामने आहेत. म्हणजे आयपीएलपूर्वी ६ एकदिवसीय सामने आणि सचिनच्या बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी ३ शतके आवश्यक आहेत. तो आता ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो आयपीएलपूर्वीच सचिनचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडेल, असे मला वाटते.”

हेही वाचा: IND vs SL: “विश्वचषकापूर्वी कर्णधार…”, ५० डावात एकही शतक नाही गौतम गंभीरने रोहितच्या फलंदाजीवर केले प्रश्न उपस्थित

विराट ४० पर्यंत खेळला तर तो सचिनचा विक्रम मोडेल : गावसकर

एवढेच नाही तर गावसकर यांनी विराटबाबत आणखी एक मोठी गोष्ट सांगितली. कोहली सचिनचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम कधी मोडू शकतो याचा अंदाजही त्याने वर्तवला. गावसकर म्हणाले, “विराटने पुढील ५ ते ६ वर्षे क्रिकेट खेळल्यास सचिनचा हा विक्रम तो मोडेल. त्याची सरासरी दरवर्षी ६-७ शतके आहे. वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत खेळला तर पुढील ४-५ वर्षांत तो शतकांच्या बाबतीत सचिनच्या पुढे जाईल.”

हेही वाचा: Babar Azam: बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकला! पाकिस्तानी कर्णधाराचा वैयक्तिक अश्लील Video व्हायरल, PCBची झाली अडचण

विराटचा फिटनेस खूप चांगला आहे

त्यामुळेच सचिन वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकला, असे गावसकर म्हणाले. “कारण तो त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेत असे आणि विराटही फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असतो हे त्याच्या शरीरावरून कळते आहे. तो फक्त ३४ वर्षांचा आहे. पुढील काही वर्षे तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकला, तर त्याला ४० वर्षे क्रिकेट खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अशा स्थितीत सचिनचा विक्रम मोडणे त्याला अवघड जाणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli vs sachin tendulkar when will virat kohli break sachin tendulkars record of most odi hundreds gavaskar fixed the time avw