आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. विराटच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे ४९ वं शतक आहे. यासह त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने अलिकडच्या काळात सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे सचिन आणि विराटची सातत्याने तुलना होत आहे. विराटने २७७ डावांमध्ये ४९ शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तर सचिनला ४९ शतकं झळकावण्यासाठी ४५२ डाव लागले होते. त्यामुळे अनेकजण विराट हा सचिनपेक्षा उत्तम असल्याचा दावा करत आहेत. परंतु, ही तुलना योग्य आहे का? अनेक क्रिकेट समीक्षकांच्या आणि तज्ज्ञांच्या मते ही तुलनाच मुळात योग्य नाही. तसेच अनेक वरिष्ठ क्रिकेट समीक्षक, माजी खेळाडू, प्रामुख्याने सचिनविरोधात खेळलेले दिग्गज गोलंदाज सचिनलाच उत्तम खेळाडू मानतात.

विराटने सचिनपेक्षा कमी कालावधीत त्याच्याइतकं किंवा त्याच्यापेक्षा कणभर अधिक यश मिळवलं असलं तरी गेल्या दोन दशकांमध्ये क्रिकेट खूप बदललंय. क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. आत्ताचं क्रिकेट हे फलंदाजधार्जिणं किंवा फलंदाजीसाठी पोषक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सचिन विराटची तुलना करताना बदलेलं क्रिकेट आपण विसरून जातो. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सचिन किंवा विराट यांच्यापैकी कोण सर्वोत्तम हे सांगणार नाही. आपण गेल्या दोन दशकांमध्ये बदलेल्या क्रिकेटची उजळणी करणार आहोत.

Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नित्या श्री सिवन हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षा तिने सार्थ ठरवली आहे
बॅडमिंटन व्हाया क्रिकेट! नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कास्यपदक
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Barinder Sran Announces International Retirement
Barinder Sran: धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
Jasprit Bumrah discusses bowlers are apt for leadership roles
Jasprit Bumrah : ‘कर्णधारपदासाठी गोलंदाजच योग्य कारण ते स्मार्ट…’, जस्सीची खदखद व्यक्त; म्हणाला, ‘आम्ही बॅट मागे लपत नाही…’
Rahul Dravid son Samit big six video
Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष

गोलंदाजीचा दर्जा

सचिनच्या काळात क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाज होते. त्याचबरोबर प्रत्येक संघाकडे एकापेक्षा एक उत्तम फिरकीपटूही होते. सचिनने वसीम अक्रम, वकार युनूस, ग्लेन मॅक्ग्रा, अ‍ॅलन डोनाल्ड, शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्यासारख्या जलदगती गोलंदाजांचा सामना केला आहे. तर शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, डॅनियल विट्टोरी, सकलेन मुश्ताकसारख्या फिरकीपटूंची त्याने धुलाई केलेली आपण पाहीलं आहे. आजही वेगवेगळ्या देशांच्या संघांमध्ये एकापेक्षा एक उत्तम गोलंदाज असले तरी या गोलंदाजांची मॅक्ग्रा, अक्रम, वॉर्न, मुरलीधरनशी बरोबरी होऊ शकत नाही.

एकाच चेंडूने गोलंदाजी

सचिनच्या काळात एकाच चेंडूने गोलंदाजी होत असल्याने जलदगती गोलंदाज इनस्विंग, आऊटस्विंगसह रिव्हर्स स्विंग गोलंदाजीदेखील करायचे, परंतु, आता एका डावात दोन चेंडूने गोलंदाजी होत असल्याने रिव्हर्स स्विंग गोलंदाजी होत नाही. चेंडू जितका जुना होईल, फिरकीपटू तो चेंडू तितका जास्त वळवतात. परंतु, आता एकदिवसीय सामन्याच्या एका डावात दोन नव्या चेंडूने गोलंदाजी केली जाते. त्यामुळे फिरकीपटूंना फारशी मदत होत नाही. पूर्वी शेन वॉर्नसारखे गोलंदाज हातभर चेंडू वळवायचे, आता चेंडू वितभर वळला तरी भरपूर झालं असं म्हटलं जातं. या नियमांमुळे गोलंदाजांची धार बोथट झाली आहे आणि फलंदाजांना त्याचा फायदा झाला. याचाच अर्थ सचिनच्या काळात फलंदाजी अवघड होती.

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. विराट आणि सचिन तेंडुलकरच्या तुलनेवर शोएब म्हणाला, सचिनच्या काळातली परिस्थिती आज असती, तर अनेक फलंदाज ढेपाळले असते. सचिन रिव्हर्स स्विंग गोलंदाजी लीलया खेळायचा. रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसमोर इतर फलंदाज गुडघे टेकायचे, तेव्हा सचिन त्यांच्याविरोधात अधिक आक्रमकपणे खेळायचा. त्यामुळे विराटला जे फायदे मिळत आहेत. ते सचिनला न मिळूनही त्याने १०० शतकं ठोकली.

पॉवर प्लेमुळे क्रिकेट बदललं

सचिन तेंडुलकरपासून विराटपर्यंत येता-येता क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नव्या नियमांनुसार फलंदाजी करणं अधिक सोपं झालं आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पॉवरप्ले या नियमाने क्रांती घडवली आहे. यामुळे प्रेक्षकांचा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रस वाढू लागला आहे. एकदिवसीय सामन्यात तीन-तीन पॉवरप्ले असतात. या नियमानुसार पाच क्षेत्ररक्षक हे खेळपट्टीभोवतालच्या ३० मीटरवर असलेल्या रेषेच्या आत ठेवण्याचा नियम आहे. म्हणजेच क्षेत्ररक्षकांवर बंधनं आहेत. पूर्वी गोलंदाजी करणारा संघ आपल्या इच्छेनुसार हवे तसे आणि हवे तिथे क्षेत्ररक्षक उभे करू शकत होते. आता असं करता येत नाही. त्यामुळे सचिनच्या काळात चौकार-षटकार लगावणं अवघड होतं. परंतु, आता ते सोपं झालं आहे. तरीसुद्धा सचिनने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तब्बल २०१६ चौकार आणि १९५ षटकार ठोकले आहेत. विराटने आतापर्यंत १२७६ चौकार आणि १४८ षटकार लगावले आहेत. या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सनथ जयसुर्या आणि कुमार संगकारा या दोघांनी अनुक्रमे १५०० आणि १३८५ चौकार लगावले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फलंदाजात आणि सचिनमध्ये ५०० चौकारांचा फरक आहे. ही आकडेवारी सचिनचं कसब दर्शवते.

एकदिवसीय क्रिकेट ५ जानेवारी १९७१ पासून सुरू झालं. तर २००५ मध्ये टी-२० क्रिकेट सुरू झालं. परंतु, पॉवर प्लेचा पहिला प्रयोग हा १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत झाला. तेव्हा सामन्यातील पहिली १५ षटकं पॉवर प्ले असायचा. या १५ षटकांमध्ये ३० मीटरच्या बाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी होती. त्यामुळे अनेक खेळाडू पहिल्या १५ षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करायचे. श्रीलंकेचा सनथ जयसुर्या या १५ षटकांच्या पॉवरप्लेमुळेच पॉवर हिटर म्हणून उदयास आहे. तो यापूर्वीही फटकेबाजी करायचा. मात्र पॉवर प्लेमध्ये तो प्रतिस्पर्धी संघातील मातब्बर गोलंदाजांची धुलाई करायचा. पंरतु, या १५ षटकांनंतर सामना निरस होत होता. त्यामुळे २००५ मध्ये पॉवर प्लेचा नियम बदलण्यात आला. आता एकदिवसीय सामन्यात तीन-तीन पॉवरप्ले असतात.

टी-२० क्रिकेटचा परिणाम

सचिन तेंडुलकरच्या काळात टी-२० क्रिकेटचं आक्रमण झालं नव्हतं. सचिनच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात हा झटपट क्रिकेटचा प्रकार सुरू झाला. सचिनने एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळून क्रिकेटच्या या प्रकारातून निवृत्ती घेतली. सचिन तेव्हा ३२ वर्षांचा होता. सचिनसह राहुल द्रविड, सौरव गांगुली या खेळाडूंनीदेखील टी-२० क्रिकेटमध्ये न खेळता नव्या आणि तरूण खेळाडूंना संधी दिली जावी असा मुद्दा मांडला. त्यानुसार २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात तरुण खेळाडूंचा संघ पाठवला. या संघाने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. सचिन, द्रविड आणि गांगुली हे वरिष्ठ खेळाडू पुढे आयपीएलमध्ये खेळले. तिघांनी आयपीएलवर छाप पाडली. परंतु, त्या काळात टी-२० क्रिकेटचं प्रमाण कमी होतं. टी-२० क्रिकेट आणि आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे खेळाडूंच्या शैलीत बदल झाले. त्यामुळे धावून धावा जमवण्यापेक्षा चौकार-षटकार फटकावण्यावर खेळाडूंचा भर वाढला. त्यामुळे खेळाडूंचा स्ट्राईक रेट वाढला. त्याचबरोबर शतकं होण्याचं प्रमाणही वाढलं.

हे ही वाचा >> ग्लेन मॅक्सवेलरुपी वादळ घोंघावतं तेव्हा!

बदललेली खेळपट्टी

खेळाडूंच्या कामगिरीत खेळपट्टीलादेखील खूप महत्त्व असतं. सचिनच्या काळात खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक नव्हती. पंरतु, अलिकडच्या टी-२० क्रिकेट, खासगी टी-२० लीग्सना अधिक लोकप्रियता मिळावी यासाठी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या. या लीग स्पर्धांना मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येदेखील फलंदाजीसाठी पोषक खेळपट्ट्या तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच गोलंदाजांसमोरची आव्हानं वाढली आहेत. तर फलंदाजी काही प्रमाणात (पूर्वीच्या तुलनेत) सोपी झाली आहे, असं आपण म्हणू शकतो.

सचिनच सरस : मोहम्मद युसूफ

इथे मांडलेले मुद्दे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीदेखील अधोरेखित केले आहेत. पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, मी जितक्या फलंदाजांना खेळताना पाहिलं आहे. त्यापैकी सचिन तेंडुलकरचा दर्जा सर्वात वर आहे. सचिन आणि विराटच्या तुलनेवर मोहम्मद युसूफ म्हणाला, विराटने सचिनची बरोबरी केली आहे. तो सचिनचे विक्रम मोडून पुढे निघून जाईल. परंतु, खेळाच्या दर्जाबद्दल बोलायचं झाल्यास सचिनच सरस ठरतो.

मोहम्मद युसूफ म्हणाला, “आत्ताच्या काळातल्या क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास विराट निर्विवादपणे सर्वोत्तम आहे. आत्ताच्या काळातील कुठलाच खेळाडू त्याच्या बरोबरीचा नाही. ४९ शतकं ठोकणं ही खूप मोठी गोष्ट आहे”. पाकिस्तानमधील समा टीव्हीशी बोलताना मोहम्मद युसूफ म्हणाला, “विराटने सचिनचे कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड मोडित काढले तर मी त्याला सचिनपेक्षा उत्तम मानेन.” कसोटी क्रिकेटमध्ये सचिन आणि विराटमध्ये अजून बरच अंतर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांसह १५,९२१ धावा फटकावल्या आहेत. तर, विराटने १११ कसोटी सामन्यांमध्ये २९ शतकं आणि २९ अर्धशतकांसह ८,६७६ धावा फटकावल्या आहेत.

हे ही वाचा >> Angelo Mathews: क्रीझवर आलेल्या मॅथ्यूजला खेळण्याआधीच अम्पायरनं दिलं बाद! काय आहे Time Out चा नियम?

सामन्यांची वाढलेली संख्या

गेल्या दशकभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतीय संघ सतत कुठे ना कुठे खेळतच असतो. सचिनच्या काळात दोन क्रिकेट मालिकांच्या दरम्यान, खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायचा. परंतु, आता क्रिकेट मालिकांचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, खेळाडूंचा वर्कलोड कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. एखाद्या दुबळ्या संघाविरुद्ध मोठ्या खेळाडूंना विश्रांती देणे, एखाद्या कसोटी मालिकेत विश्रांती देणे, अशा गोष्टी कराव्या लागत आहेत. सामने वाढल्याने आपोआप शतकं होण्याची शक्यताही वाढली आहे.

बदललेली आर्थिक संरचना

एकीकडे भारतीय क्रकेट संघ खेळाच्या दर्जासह आर्थिक स्तरावर दादा झाला आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातल्या कुठल्याही देशाच्या क्रिकेट मंडळापेक्षा श्रीमंत आहे. बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपेक्षा श्रीमंत झालं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळत आहे. भारतीय क्रिकेटमधील पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणावर, आरोग्य आणि फिटनेसवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. विराट कोहलीसारखे खेळाडू भरपूर मेहनत घेत आहेत. त्यामुळे भारतीय संघातील सर्व खेळाडू फिटनेसच्या बाबतीत अव्वल दर्जाचे झाले आहेत. याचा विराटसह भारतीय खेळाडूंना फायदा होत आहे. दुसऱ्या बाजूला अनेक देशांची क्रिकेट मंडळं कंगाल झाली आहेत. त्यामुळे त्या-त्या देशांचे संघ दुबळे झाले आहेत. उदाहरणार्थ नव्वदीच्या दशकात श्रीलंकेचा संघ मातब्बर होता. १९९६ साली श्रीलंकेने विश्वचषक जिंकला होता. तसेच, २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. परंतु, आता हा संघ आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुबळा झाला आहे. तसेच श्रीलंकेचं क्रिकेट मंडळही कंगाल झालं आहे. अशीच परिस्थिती झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचीदेखील आहे. याचा विराटसह अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे.