Ranji Trophy 2025 Virat Kohli vs Sachin Tendulkar record : विराट कोहली रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये पुनरागमन करत आहे. १२ वर्षांनंतर कोहली रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ३० जानेवारीला दिल्ली आणि रेल्वे यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी विराटनेही तयारी सुरू केली आहे. विराटला रणजीमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीची अनेकदा टीम इंडियाचा माजी दिग्गज आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी तुलना केली जाते. सचिन तेंडुलकरनेही अनेक रणजी सामने खेळले आहेत. आज आपण विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची रणजी आकडेवारी पाहणार आहोत.

सचिन तेंडुलकरची रणजी आकडेवारी –

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये ३८ सामने खेळले. या सामन्यांत सचिनने फलंदाजी करताना ४२८१ धावा केल्या. ज्यामध्ये मास्टर ब्लास्टरची फलंदाजीची सरासरी ८७.३६ होती. या काळात त्याने १८ शतके आणि १९ अर्धशतके झळकावली. सचिनची रणजीमधील सर्वोत्तम खेळी म्हणजे २००० मध्ये तामिळनाडूविरुद्ध नाबाद २३३ धावांची खेळी.

विराट कोहलीची रणजीतील आकडेवारी –

विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये २३ सामने खेळले आहेत. फलंदाजी करताना कोहलीने १५७४ धावा केल्या आहेत. कोहलीने शेवटचा रणजी सामना २०१३ मध्ये खेळला होता. कोहलीने रणजीमध्ये आतापर्यंत ५ शतके झळकावली आहेत. या काळात कोहलीची फलंदाजीची सरासरी ५०.७७ इतकी आहे. आता विराट कोहली पुन्हा एकदा रणजी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली आणि रेल्वेच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे. जिथे तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli vs sachin tendulkar whose statistics are so strong in ranji trophy vbm