India vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा डोंगर उभारला होता. सामन्याची सुरुवातच रोहित शर्माने लागवलेल्या चौकाराने झाली होती पण सामन्याच्या दुसऱ्याच्या चेंडूवर भारतीय कर्णधाराला मधुशंकाने माघारी पाठवले. पण मग विराट कोहली आणि शुबमन गिलचा ताळमेळ असा जुळून आला होता की दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना अगदी धु धु धुतले. कोहलीने ८८ धावा तर गिलने ९२ धावा करून मग पॅव्हेलियनची वाट धरली होती. गिल व कोहलीची केमिस्ट्री केवळ फलंदाजी करतानाच नव्हे तर गोलंदाजीच्या वेळी सुद्धा दिसून आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कालचा सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये असल्याने मुंबईतील अनेक दिग्गज सामन्यासाठी पोहोचले होते. सचिन तेंडुलकर व त्याची लेक सारा सुद्धा या सामन्यासाठी उपस्थित होते. शुबमन व साराच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर असताना कालची संधी त्यांचे चाहते सोडतील हे शक्यच नव्हते. अपेक्षेप्रमाणे चाहत्यांनी सामन्याच्या वेळी शुबमनला चिडवण्याचा प्रयत्न केलाच. “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो” असे म्हणत अनेकांनी स्टेडियममध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली होती.

मग अशावेळी किंग कोहलीने या चाहत्यांना शांत करून त्यांना सारा सारा नाही तर शुबमनच्या नावाच्या घोषणा द्या असे इशारा करून सांगितले. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने सांगितल्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खुश व्हाल.

https://x.com/mufaddal_vohra/status/1720145032949490132?s=20

हे ही वाचा<< “मी चौकार मारले बघितलं ना तरीही..”, श्रेयस अय्यर IND vs SL सामन्यानंतर भडकला; म्हणाला, “तुम्ही बाहेर..”

दरम्यान भारताच्या कालच्या सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १३.२ षटकात अवघ्या ५५ धावांवर गडगडला. भारताने आपला सातवा विजय नोंदवला आहे व आता भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli warns crowd teasing sara tendulkar asks to cheer shubman gill wankhede crowd goes crazy ind vs sl highlight video svs